पत्रकार म्हणजेच दर्पण विचार आहे आणि तो विचार टिकवणे काळाची गरज आहे.  ना धनंजय मुंडे

0
1364

बीड परळी वैजनाथ :नितीन ढाकणे, दिपक गित्ते  

सर्वांना पत्रकारांबद्दल विश्वासार्हता वाटायला हवी, पत्रकार म्हणजेच दर्पण म्हणजेच विचार आहे आणि तो विचार टिकवणे काळाची गरज आहे.  ना धनंजय मुंडे

लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारांकडे पहातो: महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक हेमंत देसाई

पत्रकार आणि अधिकारी यामध्ये संवाद महत्वाचा : पीएमआरडिये आयुक्त किरणकुमारजी गित्ते

ना धनंजय मुंडे यांनी आपली विचारांतून पत्रकारान वर होणारे हल्ले त्यावरील बंधने दबाव या बाबीवरून कितीदिवस आपण पत्रकार दिन साजरा करू हि शंका त्यांनी व्यक्त केली सरकार च्या विरोधामध्ये लिहिणे अवघड बनले आहे,पत्रकार म्हणजेच दर्पण, विचार आहे आणि तो विचार टिकवणे काळाची गरज आहे.  अशा स्थितीत सत्य हे पत्रकारांनी मोठ्या हिमतीने समोर मांडलेच पाहिजे, असेही या वेळी धनंजय मुंडेंनी म्हटले.  पत्रकारांचे लिखाण हे वास्तव दर्शी असायला हवे, आज देशामध्ये पत्रकारच अडचणीत आहेत. लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारांकडे पहातो असे ना धनंजय मुंडे म्हणाले

महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक हेमंत देसाई यांनी आपल्या विचारातून सध्याचे जाहिरात धोरण याविषयी आपले मत मांडले मोठ्या वृत्तमान पत्रांना प्रोत्साहन आणि लहान वृत्तमान पत्रांना संपवण्याचे कार्य जाहिरात धोरणाच्या माध्यमातून होत आहे असेहि हेमंत देसाई म्हणाले नवीन व मध्यम उधोयागांना देण्यात येणारे प्याकेज असेच प्याकेज मध्यम वृत्तमानपत्रांना द्यावे असे सरकारला वाटत नाही पत्रकारांच्या बाबतीत असलेली विश्वर्सार्हता टिकविण्याचे आव्हान पत्रकारांसमोर आहे असेहे ते म्हणाले. सर्वांना पत्रकारांबद्दल विश्वासार्हता वाटायला हवी असे कार्य पत्रकारांचे असावे पत्रकारांबद्दल आदर असायला हवा जो पूर्वी होता . तो आता कमी झालेला आहे. पत्रकारांनी सुरुवातीला आपल्या समोर आरसा धरायला हवा. हे देसाई सर आवर्जून म्हणाले

परळी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 

यावेळी कार्यक्रमास पीएमआरडिये पुण्याचे आयुक्त किरणकुमारजी  गित्ते, महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक  हेमंत देसाई, साम  टिव्हीचे वृत्तनिवेदक अनिकेत पेंडसे, जेष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर, नगराध्यक्षा सरोजिनीताई हालगे,ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे,

कार्यक्रमास मोठ्यासंखेने नागरिक,प्राध्यापक ,डॉक्टर सर्वच क्षेत्रातील नागरिक  शहर व तालुका पत्रकार संघाचे संघाचे सर्व पदाधिकारी व  पत्रकार उपस्थित होते.