शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत  लाभासठी अर्ज करावेत

0
766
Google search engine
Google search engine

शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास

योजनेंतर्गत लाभासठी अर्ज करावेत

उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उस्मानाबाद या कार्यालयाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायच्या विशेष प्रकल्प महादूध योजनेतील जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या 493 गावांमध्ये वैरण विकास योजनेंतर्गत बहुवार्षिक पिकाची लागवड, वैरण विकास विषयक प्रशिक्षण, गुणवत्तापूर्व पशुखाद्य पुरवठा, पशुखाद्य पुरके,मुरघास युनिट वाटप, विद्युतचलित कडबाकुटटी यंत्रपुरवठा या योजनेचे अर्ज उमरगा तालुका वगळून इतर तालुक्यांसाठी मागविण्यात येत आहेत.

बहुवार्षिक पिकाची लागवड व वैरण विकास विषयक प्रशिक्षण या योजनेचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 493 गावांपैकी ज्या गावातून या दोन योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले नाहीत, अशा गावातील पशुपालक शेतकऱ्यांकडून पुन्हा अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या गावातून अर्ज मागविण्यात आले आहेत, अशा गावांची यादी संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या योजनांचे अर्ज दि. 4 जानेवारी ते 24 जानेवारी 2019 या कालावधीत संबंधित पशुवैद्यकीय संस्थांच्या किंवा कार्यालयाच्या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत.

लाभार्थ्यांच्या निवडीचे अधिकार उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला आहेत. योजनेमध्ये लाभार्थी निवड झाल्यानंतर कार्यादेशापासून लाभार्थीने एक महिन्याच्या आत संबंधित बाबींची खरेदी करावयाची असून तसा प्रस्ताव संबंधित दवाखान्यात देण्यात यावा. सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या बाबींसाठी चे अनुदान डी बी टी द्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात

थेट जमा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे.