गरजू महिलांनी शिलाई मशीन अनुदानासाठी अर्ज करावेत

0
865
Google search engine
Google search engine

गरजू महिलांनी शिलाई मशीन अनुदानासाठी अर्ज करावेत

भूम पंचायत समितीच्या सेस योजनेतून मिळणार शिलाई मशिन

उस्मानाबाद,दि.7:- पंचायत समिती भूम सेस योजना सन 2018-2019 मध्ये ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन ही योजना घेण्यात आली आहे.

तेव्हा ग्रामीण भागातील सर्वसाधारण महिलांनी तात्काळ शिलाई मशीनच्या अनुदानाकरिता अर्ज करावेत. अर्जासोबत तहसिलदारांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जोडावीत तसेच हे अर्ज एकात्मिक बाल विकास योजना, भूम यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना, भूम, यांनी कळविले आहे.