उपयुक्त आणि लोकमन घडवणारे लेखन पत्रकारांनी केले पाहिजे –         ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

203

उपयुक्त आणि लोकमन घडवणारे लेखन पत्रकारांनी केले पाहिजे

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

उस्मानाबाद,दि.7:- बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्राचा जो दर्जा प्रस्थापित केला त्याचे अनुकरण आजच्या वृत्तपत्रांनी करणे गरजेचे आहे लोकांना उपयुक्त आणि लोकमन घडवणारे लेखन पत्रकारांनी केले पाहिजे, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी तुळजापूरात केले.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ सभागृहामध्ये बबनराव शेळके व्यासपीठावर राज्यस्तरीय श्री तुळजाभवानी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, मुंबई आणि जिल्हास्तरीय क. भ. प्रयाग पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोकळे यांना राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जि .प .अध्यक्ष नेताजीराव पाटील, तुळजापूरचे नगराध्यक्ष बापूसाहेब कने, राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उद्योजक देवदत्त मोरे, माजी नगराध्यक्ष प्रकाश देशमुख,कुलस्वामिनी सुतगिरणी माजी अध्यक्ष अशोक मगर, जिल्हा चिटणीस अविनाश देशमुख ,जि प सदस्य महेंद्र धुरगुडे, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे , तु भ. उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोडो, पंचायत समिती माजी सभापती संतोष बोबडे ,ज्येष्ठ पत्रकार किशोर कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप नारीकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव देविदास पाठक, तालुकाध्यक्ष डॉ सतिष महामुनी यांची उपस्थिती होती

प्रारंभी तुळजाभवानी देवी इतिहासतज्ञ क. भ. प्रयाग आणि दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभास्ते करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार गोविंद करून अनिल आगलावे ,ज्ञानेश्वर गवळी, शुभम कदम, सचिन ताकमोगे ,गणेश लगदिवे ,संजय गायकवाड, जगदीश कुलकर्णी , संजय कुलकर्णी, श्रीनिवास साळुंखे यांच्या शुभ हस्ते असते स्वागत करण्यात आली . प्रास्ताविक अध्यक्ष सतिष महामुनी यांनी केले.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री तुळजाभवानी पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी भाऊ तोरसेकर यांनी पुढे बोलताना प्रसारमाध्यमांचे जगात कालपरत्वे नवनवीन आव्हाने समोर येतात. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पत्रकारांनी नव्या कौशल्याचा उपयोग केला पाहिजे आणि उत्तम कौशल्य वापरून उत्तम विचार ,उत्तम भूमिका आणि निपक्षपातीपणे लेखन केले पाहिजे त्याशिवाय आपल्या लिखाणाला लोक मान्यता मिळणार नाही. उलट तपासणी आणि जागता पहारा या माझ्या .लेखनावरून मला आलेला अनुभव असा की आपली भूमिका ठासून मांडण्याची क्षमता पत्रकारांमध्ये निर्माण झाली पाहिजे त्यासाठी पत्रकारांनी आपले स्वतःचे ज्ञान वाढवले पाहिजे पत्रकाराच्या ज्ञानावर महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याची शक्ती आहे. अनेक प्रसंगांमध्ये प्रसारमाध्यमांचे प्रभुत्व लोकशाहीमध्ये सिद्ध झालेले आहे . लोकशाही आणि पत्रकारितेच्या इतिहासामध्ये आपण योग्य वेळी योग्य ज्ञान मिळवून त्याचा पत्रकारितेसाठी उपयोग करावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

तुळजाभवानीचा आशीर्वाद म्हणून आजचा हा सत्कार मी स्वीकारत आहे हा सत्कार माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वपूर्ण असून तुळजापूर तालुका पत्रकार संघाने केलेल्या सत्काराबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो असेही भाऊ तोरसेकर यांनी सांगितले. या प्रसंगी क.भ. प्रयाग पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोफळे यांनी तालुका पत्रकार संघाने आपली दखल घेऊन आपणास सन्मानित केले हा सुखद अनुभव माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यातील महत्वाचा आहे .माझ्या परीने मी पत्रकारितेला सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला, माझ्या परीने मी समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढील काळातही करणार आहे असे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले. समारंभा साठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठवलेला संदेश युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी वाचून दाखवला. याप्रसंगी डॉ. सतिष महामुनी यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन संजय मैदगी व गोविंद खुरुद यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी परिवहन मंत्री मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकार गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेची जबाबदारी सांभाळून काम करतात. आज भाऊ तोरसेकर आणि अंबादास पोकळे या प्रामाणिक पत्रकारांचा केलेला सत्कार मनाला समाधान देणार आहे . कारण पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणाला खूप मोठे महत्त्व आहे . प्रामाणिक पणे मांडलेला विचार समाजाला योग्य दिशा देणारा असतो विविध प्रसंगांमधून पत्रकारितेचे महत्व समाजाला लक्षात आलेले असते . नव्या काळामध्ये सोशल मीडिया च्या जगतामध्ये देखील चांगले लेखन केले जाते , प्रसार माध्यमांच्या जगामध्ये आजच्या काळात झालेले अत्याधुनिक बदल नव्या पत्रकारांनी स्वीकारून समाजाची सेवा करावी. इतिहासतज्ञ कै.क.भ.प्रयाग यांच्या बाबत आमदार चव्हाण यांनी गौरवोद्गार काढले आणि त्यांनी केलेल्या संशोधन लेखक लेखनाबद्दल त्यांचे त्यांचे कौतुक केले पत्रकार संघ आणि त्यांचे नावे सुरू केलेल्या पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी आहे असे सांगितले.

मानपत्र कमिटीतील गुरुनाथ बडुरे, श्रीनिवास साळुंखे , गिरीश कुलकर्णी प्रभाकर जाधव ,उत्कर्ष दीप प्रयाग, स्वागत समितीतील सोमनाथ बनसोडे सोमनाथ शेटे, संतोष मगर, तानाजी धोतरकर ,सिद्धी पाटील, नियोजन समितीतील सचिन ताकमोगे शुभम कदम विष्णू गायकवाड, राहूल कोळी , रूपेश डोलारे, देवीदास पाटील, प्राध्यापक हंगरगेकर यांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी आयुब शेख, किरण चौधरी, नगरसेवक पंडित जगदाळे , इंद्रजीत साळुंखे, किशोर गंगणे , विपीन शिंदे, संजयकुमार बोंदर, रो. सचिन शिंदे ,राजाभाऊ वाघ ,संदीप गंगणे , सचिन कदम मकरंद प्रयाग, बाळासाहेब शामराज्, प्रा धनंजय लोंढे, माजी जि प सदस्य काशिनाथ बंडगर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।