सर्वसाधारण घटक योजनेंतर्गत अन्नधान्य व फळ प्रक्रिया व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

0
942

सर्वसाधारण घटक योजनेंतर्गत अन्नधान्य व फळ प्रक्रिया व

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ व भैरवनाथ किसान कृषी प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण घटक योजनेंतर्गत अन्नधान्य व फळ प्रक्रिया व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम कळंब तालुक्यातील गौर येथे आयोजित करण्यात आला होता.

दि. 4 जानेवारी रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील या उपस्थित होत्या. त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनीदेखील यावेळी आपले मनोगत व्यक्त करून व्यवसायात येणाऱ्या त्यांच्या समस्या व अडचणी मांडल्या. जि.प.उउपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी हिरकणी महोत्सवात येथील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्याचे महिलांना आवाहन केले. तात्यासाहेब देशमुख यांनी कंपनीची वाटचाल व पुढील भविष्यात कंपनी स्थापन करणे, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने कंपनी काम करणार आहे, असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

विस्तार अधिकारी डी. टी. साळुंके यांनी या कंपनी अंतर्गत क्लस्टर तयार करून या प्रस्तावांतर्गत गौर वाघोली, बरमाचीवाडी ,शिंगोली, भोसा,सातेफळ, दहिफळ, खेर्डा, हळदगाव या गावांचा समावेश करून या गावातील होतकरू शेतकरी एकत्र येऊन गावातील शेती, गावातील शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व महिलांना एकत्र करून मसाला उद्योग निर्माण करण्यासाठी, हे प्रशिक्षण उपयोगी पडणार आहे, असे सांगितले.

कार्यक्रमास माजी उपसभापती तात्यासाहेब देशमुख, भैरवनाथ किसान कृषी प्रोडुयसर कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र तिबोले,त्रयंबक घोंगडे, भिवाजी शेळके सुनिल घोंगडे, जनार्धन लंगडे,सतिश माने , हनुमंत माने, भोसा,गौर वाघोली येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच, पंचायत समिती सदस्य, कंपनीचे संचालक मंडळ, कृषी सहाय्यक व इतर मान्यवर तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास केसरे यांनी मानले.