पथनाट्यातुन बाळापूर पोलिसांचे समाज प्रबोधन

0
838

पोलीस उदय दिन व रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप

अकोला/प्रतीनिधी

पोलीस उदय दिन व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्य बाळापूर पोलिसांनी ट्राफिक चे नियम पाळा अमूल्य जीवन वाचवा या पथनाट्यातुन समाज प्रबोधन करत वाहतुक नियमांबाबत जनजागृती केली.

देशात रस्ते अपघातात दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात तर लाखो लोक जखमी किंवा कायमचे जाय बंदी होतात, जीवन अमूल्य असल्याने रस्ते अपघातात प्राणहानी होऊ नये म्हणून प्रत्येक वाहन चालविणार्यांनी रहदारीच्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले तर रस्ते अपघातात जाणारे कितीतरी जीव वाचू शकतात ,ह्या साठी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उदय दिवस निमित्ताने दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत बाळापुर पोलीसांद्वारा वाहतूक सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला,

सप्ताहात बाळापूर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख ह्यांचे मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले ह्या सप्ताहाची सांगता आज दि.8 ला बाळापूर येथील खतीब सभागृहात विद्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थिती मध्ये पथनाट्य सादर करून करण्यात आली, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, व प्रमुख उपस्थिती प्रशिक्षणार्थी पोलिस उप अधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख ,पोलीस निरीक्षक गजानन शेळके हे होते, प्रास्ताविक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले.पोलीस उदय दिवसाचा इतिहास सांगून पोलीस व जनता ह्यांचा एकमेकां वरचा विश्वास शांतता व सुवयवस्था टिकवून ठेवण्या साठी किती महत्वाचा आहे हे सांगून त्यांनी वाहतूक सुरक्षे विषयी माहिती सांगितली,

प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख ह्यांनी वाहतूक सुरक्षे विषयी माहिती सांगून हेल्मेट नेहमी वापरण्याचे आवाहन केले, उपविभागीय अधिकारी संजय खडसे ह्यांनी वाहतूक नियम पाळून आपले अमूल्य जीवन वाचवा व रोड अपघातात जाणारे हकनाक बळी हे देशाचे भरून न येणारे नुकसान आहे असे प्रतिपादन केले, त्या नंतर पोलीस कर्मचारी निलेश गाडगे लिखित व दिग्दर्शित सर्व पोलीस कर्मचारी भूमिका असलेले वाहतूक सुरक्षेवरील पथनाट्य चे सादरीकरण झाले, ह्या पथनाट्य ला जमलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून दाद दिली, हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक जोशी, वाहतूक कर्मचारी जयवंत शिंदे व गिरीश वीर व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.