आनंददायी गणित… प्राथमिक गणित विषयाचे आकोटला मोफत प्रशिक्षण

0
813
Google search engine
Google search engine
दिल्ली येथील तज्ञ्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन
आकोट/ता.प्रतीनीधी
उन्नती संस्थेच्या वतीने आनंददायी पद्धतीद्वारा प्राथमिक गणित विषयाचे मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आकोट येथे करण्यात आले आहे.गणित विषय बऱ्याच मुलांचा नावडीचा असतो कारण त्यांना गणित जमत नाही. गणित कशा पद्धतीने शिकविले जाते त्यावर मुलांचे गणिताचे ज्ञान अवलंबून असते. इयत्ता १ ते ४ च्या मुलांना गणित शिकविण्याच्या आनंददायी पद्धतींचे प्रशिक्षण उन्नती संस्थेद्वारा दि. ११ व १२ जानेवारी रोजी सकाळी ९ ३० ते सायंकाळी ६ या वेळेत निश्चय अकॅडमी, लक्झरी बस स्थानकासमोर, अकोट येथे आयोजित केले आहे. वरील प्रशिक्षण दिल्ली येथील जोडोग्यान संस्थेने विकसित केलेल्या गणित प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित आहे, हे प्रशिक्षण सर्वासाठी मोफत आहे.प्रत्येकाने येताना आपला जेवणाचा डबा घेऊन येणे गरजेचे आहे. जे मुलांना शिकविण्याचे कार्य करतात व ज्या पालकांना रस आहे अशांनी ही संधी घ्यावी. नाव नोंदणी व संपर्क . भ्रमणध्वनी क्रमांक : ९५९५१०८०१८ असे आयोजकांनी कळवले आहे.