अकोल्याच्या डॉ. दीपक मोरे द्वारा निर्मित ‘आसूड’ चित्रपटाची महाराष्ट्राला उत्सुकता…!

0
2024
Google search engine
Google search engine

अकोला/प्रतीनिधी

अकोला येथिल प्रसिद्ध डॉ. दीपक मोरे द्वारा निर्मित ‘आसूड’ चित्रपटाची महाराष्ट्राला उत्सुकता लागुन पडली असल्याचे चित्र दिसते आहे.विदर्भपुत्र डॉ दिपक मोरे यांची दर्जेदार निर्मिती असणारा ‘आसूड’ चित्रपट
येत्या 8 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होतो आहे.विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन हे अकोल्याचे युवा दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी केले असुन अनेक वह्राडी कलावंताची या चित्रपटात विशेष एंट्री असल्याचे कळते आहे.

महाराष्ट्राच्या सिने क्षेत्रात धमाका करण्यास सज्ज असणाऱ्या ‘आसूड’ चित्रपटाच्या प्रोमोंना रसिकांचा तुफान पसंती मिळत असुन ,चित्रपटाच्या यशास सज्ज आसल्याचे दिसुन येत आहे.विदर्भातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातुन डॉक्टर झालेल्या डॉ.दिपक मोरेंच्या या सांस्कृतिक उपलब्धीने वैदर्भिय कला श्रीमंती नव्याने अनुभवायला महाराष्ट्रातील रसिक आतुर झाला असुन चित्रपट प्रसिद्ध होण्याच्या आधीपासुनच रसिकांनी आसुडच्या टीम ला डोक्यावर घेतल्याचे दिसते आहे.

या उपलब्धीने आसूड चित्रपटाचे निर्माता सन्माननीय डॉ. दीपकजी मोरे साहेब यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला. वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज नावाला आता चित्रपटसृष्टीतही सोन्यासारखी झळाळी येणार,असे यावेळी खेडेकर म्हणालेत.
अत्यंत दर्जेदार असलेला आसूड चित्रपट देशभरात गाजो, अशा सदिच्छाही पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांना दिल्यात.आसुडचे दिग्दर्शक निलेश जळमकर सर, सहदिग्दर्शक अमोल ताले, अभिनेता अमित्रीयान पाटील, विक्रम गोखले, दीपक शिर्के, रश्मी रजपूत, प्रसिद्धीप्रमुख विनोद बोरे यांच्यासह ‘आसूड’च्या सर्व टीमची मेहनत फळाला येणारच, असा विश्वासही खेडेकर यांनी व्यक्त केला.