शिक्षण ही काळाची गरज – श्री अरुण मखमले >< सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा

0
718
Google search engine
Google search engine

मलकापुर पाग्रा:-

स्थानिक कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय व जिला परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा मलकापुर पांगरा यांच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती त्याचा बक्षिस वितरण सोहळा आज पार पडला
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोबत त्यांना सामान्य ज्ञान माहिती यावे या उद्देशाने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये 2 गट पाडण्यात आले होते प्राथमिक व माध्यमिक यामध्ये प्राथमिक गटातून प्रथम शिफा रहूफ दुतीय सय्यद मुनतसीम व तुतीय राहत अंजुम
तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक जवेरीया फिरदोस दुतीय क्रमांक आसेफा बी तर तुतीय क्रमांक उमेद खान यांनी पटकावला त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अरुण मखमले; तर प्रमुख पाहुणे म्हणून अझर भय्या ;फकिरमत पठाण; नाहेद खान; रफिक सर; शौकत सर;अहेमद भाई; जफर खान;वसीम पत्रकार हे लाभले होते तर वक्ते म्हणून प्रा तंझीम हुसेन यानि मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुण मखमले यांनी पालकाची शिक्षणाची जबाबदारी व शिक्षणाचे महत्व यावरती मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी व पालक हजर होते सदर कार्यक्रमाला कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौसिफ सर यांनी तर आभार जलील शेख समिती अध्यक्ष यांनी मानले