उस्मानाबादेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी ; सामुहिक वंदना , ५३ दात्यांनी केले रक्तदान

359
जाहिरात

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

सामुहिक वंदना : ५३ दात्यांनी केले रक्तदान

उस्मानाबाद : शहरतील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवारी
सकाळी जिजाऊ चौकात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पूर्णकृती
पुतळ्याचे पूजन करून सामुहिक वंदना करण्यात आली़ जयंतीनिमित्त आयोजित
रक्तदान शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले़
उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकात आयोजित कार्यक्रमात शनिवारी सकाळी
नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब
यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले़ तसेच सामुहिक वंदना
करण्यात आली़ त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले़ या शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान
केले़ कार्यक्रमास शिक्षण तज्ज्ञ एम़डी़देशमुख, प्रशांत पाटील, पत्रकार
संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, नगरसेवक सोमनाथ गुरव, शिवसेना शहरप्रमुख
पप्पू मुंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रोहित बागल, जि़प़सदस्या
सक्षणा सलगर, जयराज खोचरे, नादेरुल्ला हुसैनी, हेमंत चौधरी, माजी नगरसेवक
रोहित निंबाळकर, हेमंत चौधरी, तुळजापूरच्या माजी नगराध्यक्ष मंजुषा मगर,
रवी कोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, समितीचे अध्यक्ष मयुर
काकडे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष अभिजित निंबाळकर, अमित
उंबरे, विवेक कापसे, राज ढवळे, सुभाष वाघ, हरिश्चंद्र मगर, प्रहारचे
बाळासाहेब कसबे, जमीर शेख, शिवकुमार माने, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर
चव्हाण, उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल, मध्यवर्ती शिवजयंतीचे अध्यक्ष
प्रणिल रणखांब, वर्षाराणी कुदळे, मनोज डोलारे, बलराज रणदिवे यांच्यासह
समितीचे पदाधिकारी, सदस्य, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़