उद्योगपतींचे असेही उद्योग: रत्नाकर गुट्टेंसह अन्य सहा जणांवर कलम ४९८ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल

0
1117

सुदामती गुट्टेंची पोलिसात तक्रार, रत्नाकर गुट्टेंसह सहा जणांविरुद्ध ४९८ नुसार गुन्हा दाखल 

परळी नितीन ढाकणे, दिपक गित्ते
सातत्याने वादाच्या भोवर्‍यात राहणारे गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे हे शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची तक्रार देत सामाजिक कार्यकर्त्या तथा रत्नाकर गुट्टेंच्या सौभाग्यवती सुदामती गुट्टे यांनी रत्नाकर गुट्टेंविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कलम ४९८ भा.दं.वि.नुसार गुट्टेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रत्नाकर गुट्टे गेल्या काही दिवसांपासून सुदामती गुट्टे यांना घटस्फोट मागत असल्याचे सांगण्यात आले. सुदामती गुट्टे यांनी रितसर तक्रार दिली असून तक्रारीत अन्य बाबी काय मांडलेल्या आहेत. गुट्टेंसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. यातील फिर्यादी या ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांच्या आई आहेत 
कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादाच्या भोवर्‍यात राहणारे उद्योजक म्हणून चर्चेत असणारे रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणी आता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सौभाग्यवती तथा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या सुदामती गुट्टे यांनी आज परळी शहर पोलिसात रत्नाकर गुट्टे यांच्यासह अन्य सहा जणांवर शारीरिक, मानसिक छळाबरोबर रत्नाकर गुट्टे हे घटस्फोट मागत असल्याची तक्रार दिली आहे. सुदामती गुट्टे यांच्या तक्रारीवरून रत्नाकर गुट्टेंसह अन्य सहा जणांवर कलम ४९८ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीमध्ये गुट्टे व त्यांच्या परिवारातून आपला शारीरिक, मानसिक छळ सातत्याने केला जात असल्याचे म्हटले आहे.