उस्मानाबाद जिल्ह्यातील क्राईम बातम्या

0
940
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 140 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 11/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 140 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 32 हजार 600 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

“ तुळजापूर येथे कॉम्प्लेक्समध्ये चोरी ”

पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 10/01/2019 रोजी 22.00 ते दिनांक 11/01/2019 रोजी 06.00 वा.सु. सचिन पाटील यांचे कॉम्प्लेक्स मधील संकेत रमेशचंद्र गर्ग रा.शिवप्रकाश कॉलनी नळदुर्ग रोड तुळजापूर यांचे किराणा दुकानातील गल्यातील रोख रक्कम 4,000/- रु. व तुळजाई टायर दुकानातील टायर किं.अं. 1700/- रु. व क्षितीजा मेडीकल दुकानातील गल्यातील रोख रक्कम 700/- रु. असा एकूण 6,400/- रु.चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करुन चोरी करुन घेवून गेला आहे. म्हणून संकेत रमेशचंद्र गर्ग याचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2

“ लोहारा येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहान ”

पोलीस स्टेशन लोहारा :- दिनांक 11/01/2019 रोजी 14.30 वा.सु. मौजे माकणी येथे फिर्यादी महिला ही तिच्या घरासमोर वाढयाच्या पेंडया बांधत असताना 1) बालाजी मारुती कुसळकर व एक महिला दोघे रा.माकणी ता.लोहारा यांनी संगणमत करून फिर्यादी महिलेस तुम्ही आमच्या घरासमोर उभा केलेल्या टमटमचे नटबोल्ट का काढले असे म्हणून शिवीगाळ करून चापटा मारून मारहान केली व आरोपी महिला हिने फिर्यादी महिलेच्या उजव्या कानातील कर्नफुलास धरून ओढून फिर्यादी महिलेच्या कानाची बाळी तोडून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून बालाजी मारुती कुसळकर व एक महिला यांचेविरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 324,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

“ मौजे कदेर येथे कोर्टात केस केल्याच्या कारणावरून मारहान ”

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 10/01/2019 रोजी 15.00 वा.सु. 1) रमेश सुभाष बिराजदार 2) मुकुंद सुभाष बिराजदार व दोन महिला सर्व रा.कदेर ता.उमरगा यांनी सुभाष मारुतीराव बिराजदार व त्यांची पत्नी शेतात काम करित असताना तु आमच्या विरुध्द कोर्टात केस का केली म्हणून शिवीगाळ करून मुकुंद बिराजदार याने सुभाष बिराजदार यांना दगडाने मारले व त्यांचे पत्नीस विळयाने डोकयात मारुन जखमी केले व लाथाबुक्याने मारहान करुन शेतात आलात तर जिवंत ठेवणार नाही असे म्हणून धमकी दिली. म्हणून सुभाष मारुतीराव बिराजदार यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीविरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर कार व जिपचा अपघात ”

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- दिनांक 11/01/2019 रोजी 00.30 ते 01.00 वा.चे दरम्यान मानेवाडी पाटीजवळ गॅस गोडावून जवळ नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर गोरख एकनाथ गावडे हे त्यांचे ताब्यातील फोर्ड विको क्र. एम.एच. 20 ई वाय 5004 ने तुळजापूर कडून नळदुर्ग कडे येत असताना समोरुन टाटा सफारी क्र. ए.पी. 29 ए.डी. 5517 च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून फोर्ड विको या वाहनास समोरुन धडक दिल्याने विको गाडीतील गोरख एकनाथ गावडे , नवनाथ शेषेराव भटळे , अविनाश बाळासाहेब पाटील , गणेश बाबुराव आरदड यांना जखमी करुन दिपक माधवराव पन्हाळ यास गंभीर जखमी करणेस कारणीभूत झाला. म्हणून गोरख एकनाथ गावडे यांचे फिर्यादवरून टाटा सफारी क्र. ए.पी. 29 ए.डी. 5517 च्या चालकाविरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल ”

पोलीस स्टेशन शिराढोण :- दिनांक 11/01/2019 रोजी कळंब ते ढोकी रोडवर धनु संदिपान फरे रा.नितळी ता.जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील अशोक लिलॅन्ड दोस्त क्र. एम.एच. 25 पी 5273 हे वाहन सार्वजनिक रहदारीस व येणारे जाणारे लोकास अडथ्‍ळा निर्माण होईल व त्यांचे जिवीतास धोका निर्माण होईल्‍ असा उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 11/01/2019 रोजी बस स्टॅन्ड पाथ्रुड येथे जितेंद्र अशोक निरफळ याने त्याचे ताब्यातील क्रुझर जिप क्र. एम.एच. 25 आर. 2179 हे वाहन सार्वजनिक रहदारीस व येणारे जाणारे लोकास अडथ्‍ळा निर्माण होईल व त्यांचे जिवीतास धोका निर्माण होईल्‍ असा उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

पोलीस स्टेशन आंबी :- दिनांक 11/01/2019 रोजी नळी फाटा येथे सलीम आझमोद्दीन शेख रा.आंतरवली ता.भुम याने त्याचे ताब्यातील ॲपे टेम्पो क्र.एम.एच. 25 पी 263 हा टमटम सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस व येणारे जाणारे लोकास अडथ्‍ळा निर्माण होईल व त्यांचे जिवीतास धोका निर्माण होईल्‍ असा उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 11/01/2019 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ अपर जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन गुन्हा नोंद ”

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 07/12/18 रोजीचे अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांचे जुने वाहन भंगार मध्ये खरेदी-विक्री बाबत संबंधीत पोलीस स्टेशनला माहीती देणे बंधनकारक असताना दिनांक 11/01/2019 रोजी 17.00 वा. चे सुमारास रशीद बशीर शेख रा. जुना बस डेपो, खॉजा नगर, उस्मानाबाद . याने आर लोखंडवाला या भंगाराचे दुकानात खाँजा नगर उस्मानाबाद येथे जुने वाहन भ्ंगार मध्ये खरेदी विक्री करुन अपर जिल्हा दंडाधिकारी उस्मानाबाद यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन सदाशीव भागवत धुपेकर पोलीस हवालदार दहशत वाद विरोधी पथक उस्मानाबाद यांचे फिर्यादवरुन रशीद बशीर शेख याचे विरुध्द दिनांक 11/01/19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 188 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“ मौजे मोहा येथे मोटारसायकलची चोरी ”

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 07/01/2019 रोजी 21.00 ते दिनांक 8/1/2019 रोजी 05.00 वा.चे दरम्यान जगजीत सुखदेव मडके रा.मोहा ता.कळंब यांची त्यांचे घरासमोर उभा केलेली हिरो कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.ए. 0395 जु.वा.किं.अं. 12,000/- रु. ची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. म्हणून जगजीत सुखदेव मडके यांचे फिर्यादवरून अज्ञात आरोपीविरुध्द दिनांक 12/01/2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरून मारहान ”

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 12/01/19 रोजी 10.15 वा. प्रतापसिंह विजयसिंह पाटील रा.कारी ता.बार्शी जि.सोलापूर हे बार्शी नाका उस्मानाबाद येथील आदित्य पेट्रोलपंप येथे मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरिता गेले असता पंपावर गर्दी असल्याने प्रतापसिंह विजयसिंह पाटील हे लाईनने पंपा पर्यंत गेले असता आदित्य पेट्रोल पंपावरील प्रकाश बजरंग मिसाळ याने मध्येच आलेल्या दुसऱ्या मोटारसायकल मध्ये पेट्रोल टाकत असल्याने प्रकाश मिसाळ यास प्रतापसिंह विजयसिंह पाटील हे मी येथे लाईनने येऊन थांबलो आहे तु बिगर लाईनचे लोकांना पेट्रोल का टाकतो असे म्हणाले असता प्रकाश बजरंग मिसाळ याने प्रतापसिंह विजयसिंह पाटील यांना तु कोण विचारणार तुझी गाडी बाजुला घे असे म्हणून शिवीगाळ केली व ढकलून दिले म्हणून प्रतापसिंह विजयसिंह पाटील यांचे डोक्यास मार लागून जखम झाली आहे. म्हणून प्रतापसिंह विजयसिंह पाटील यांचे फिर्यादवरून प्रकाश बजरंग मिसाळ याचेविरुध्द दिनांक 12/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 324,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ वॉरंन्ट निघुन देखील कोर्टात हजर न राहणाऱ्यावर गुन्हा दाखल ”

पोलीस स्टेशन शिराढोण :- भाऊ मोहन आवाड रा.कोल्हेगाव ह.मु. सिध्दार्थ् नगर मामुर्डी रेड्डी देहुरोड पुणे हा मा.न्यायालयाकडुन काढण्यात आलेल्या समन्स / वॉरंन्ट मध्ये हजर राहीला नाही तो गेल्या 24 वर्षापासून दि. 12/01/2019 रोजी पावेतो सत्र न्यायालय उस्मानाबाद येथील खटल्यामध्ये फरार होता. त्याने मा.न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच भाऊ मोहन आवाड यास मा.न्यायालयाने जामीनवर किंवा बंधपत्रावर सोडलेले असताना भाऊ मोहन आवाड याने काही एक कारण नसताना मा.न्यायालयात हजर राहण्यास कसुर केला आहे. म्हणून त्याचेविरुध्द दिनांक 12/01/2019 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 229(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

“ कळंब पोलीसांची कारवाई जबरी चोरी करणाऱ्यांना तात्काळ अटक ”

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 12/01/19 रोजी 01.30 वा.च्या सुमारास रामप्रसाद बापूराव खरात रा.परभणी ता.परभणी हा ट्रक क्र.एम.एच. 22 ए.ए. 9599 या मध्ये गठाण भरून सातारा येथे जात असताना होळकर चौक कळंब येथे आला असता दोन अनोळखी ईसमांनी त्यांच्या मोटारसायकलवर पाठीमागून येवून ट्रकला मोटारसायकल आडवी लावून रामप्रसाद बापूराव खरात यास तुझ्याकडे असलेले पैसे दे नाहीतर तुला बघुन घेवु व मारुन टाकू अशी धमकी देवून रामप्रसाद बापूराव खरात याचे खिशातील 500/- रु. व 6000/- रु. किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल काढून घेतले म्हणून रामप्रसाद बापूराव खरात हे पोलीस स्टेशन कळंब येथे गेले असाता पोलीस ठाणे अंमलदार यांनी जिप पेट्रोलिंगचे कर्मचारी यांना सदर आरोपींचा शोधे घेणेबाबत कळविलेने जिप पेट्रोलिंगचे कर्मचारी यांनी सदर मोटारसायकलचा शोध घेवून दोन ईसम व सदर मोटारसायकल दिनांक 12/01/2019 रोजी 02.15 वा. पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले व पकडलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांची नावे 1) शफीक आलीम मोमीन 2) महेबुब महंमद शेख दोघे रा.कळंब असे सांगितले व त्यांचेकडून रामप्रसाद बापूराव खरात यांचा चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर चोरी बाबत रामप्रसाद बापूराव खरात यांचे फिर्यादवरून 1) शफीक आलीम मोमीन 2) महेबुब महंमद शेख यांचे विरुध्द पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 392,341,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.