अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या भव्य युवा रॕलीने शहर भगवामय

799

आकोट/ प्रतीनीधी

सलग पाचव्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या कार्यकर्ता तथा विद्यार्थी विद्यार्थीनींनी स्वामि विवेकानंद जयंती युवा दिन निमित्त आकोट शहरातुन भव्य दिव्य युवा रॕली काढली रॕलीने शहर भगवामय वातावरणात गढुन गेले होते.तर युवा मनांच्या जोशाने युवाजागर चेतलेला दिसला.12 जानेवारी स्वामी विवेकानंद युवा दिवस म्हणून अखिल भारतीय विध्यार्थी परिषद .अकोट तर्फे भव्यबाईक रॅली चे आयोजन करण्यात येते.

विशेष म्हणजे संपूर्ण रॅली ही पारंपरिक वेष भूषेमध्ये असते.यंदाच्या रॅलीची सुरवात राज माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्री सरस्वती महा विद्यालय अकोट मधून प्रारंभ झाली. रॕली श्री शिवाजी कॉलेज रोड , अकोला नाका , शिवाजी चौक ,सोनू चौक ,सराफा लाईन ,पटेल चौक , गोल बाजार , पान अटई, बळी राम चौक , सोमवार वेस, वाल्मीकि चौक , कालंका चौक या मार्गाने जात नरसिंग मंदिर पटाँगन येथे समारोप झाला.

यावेळी रैली चे जवाहर रोड़ येथे विकास रेडीमेड, सराफा बाजार मधे अम्बिका ज्वेलर्स, व संस्कृति संवर्धन समिति , मोठे बारगन मधे रवि एलेक्ट्रिनिक्स व जय जवान जय किसान मंडळाने पुष्पवृष्टी करुन भव्य स्वागत केले.

रैली च्या सांगते वर अखिल भारतीय विध्यार्थी परिषद आकोट चे अध्यक्ष मा. प्रा. भूषण ठाकुर र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे नगर कार्यवाह नीतिन शेगोकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

रैली च्या यशस्वितेसाठी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद आकोट च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात