कृषि विद्यापीठात युवक दिन व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी !

0
794
Google search engine
Google search engine

अकोला/प्रतीनिधी

जागतीक महासत्ताक होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या भारत देशाला युवा शक्तीची भक्कम साथ लाभली असून कृषि प्रधान संस्कृती जोपासत राष्ट्र प्रेम आणि सामाजिक बंधुता अधिक वृद्धींगत करावी असे आवाहन करतांना दैनंदिन जिवनात विवेकानंदांचे विचार व जिजाऊ मासाहेबांचे संस्कार अखंड भक्कम भारत घडवणारे युवक निर्मीतीसाठी प्रेरक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार श्री. सूर्यकांत भारतीय यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शाखा डॉ. पदेकृवि द्वारा कृषि महाविद्यालय अकोलाचे समिती सभागृहात आयोजीत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मांसाहेब यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शक वक्ते म्हणुन ते बोलत होते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर अतिशय मार्मिक आणी अभ्यासपूर्ण भाष्य करतांना श्री. भारतीय यांनी अनेकानेक वास्तविक दाखले देत आपल्या प्रेरक विचारांनी उपस्थित युवा वर्गाला अंतर्मुख केले व स्वतः मध्ये असलेल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.

विदर्भ प्रांत सहमंत्री कुशाल राठोड यांचे नेतृत्वात सम्पन्न झालेल्या य़ा कार्यक्रम प्रसंगी नगर संघटनमंत्री शक्तीज केराम व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते,अक्षय आसोलकर.ओम गुल्हाने . प्रमोद नांगरे, कृणाल डोनाडे, वैभव खिरोडकर , ऋषिकेश साखरे, कुणाल वानखेडे, अजय खोडके, विवेक सोठगिर, गौरव गोटे, निरज मडावी, आकाश सातवकर, शुभम तायडे,हर्षित गजबे, इंद्रनिल घरटे,अश्र्विन नागझिरकर, मनोज भोयर , निखिल राठोड, हरिओम जानोरकर,सौरव गायकवाड, गौरव राजपूत, वैभव पवार, कुणाल अपार , योगेश मानवतकर, हर्षल तोटावार, विवेक जाधव,प्रतिक भरणे, अनिकेत सावंत, अश्विन राठोड याचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी वर्गानी आयोजित केलेल्या य़ा शिस्तबद्ध कार्यक्रमाला प्रा. डॉ. उपेंद्र कुलकर्णी तथा विद्यापीठ जनसम्पर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानेश्वर इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन सौरव गायकवाड यांनी केले.