रघुनंदन निधी बँकेने केला अकोट शहरातील पत्रकारांचा सत्कार….

0
1510
Google search engine
Google search engine

मा.नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे व सहकाऱ्यांचे आयोजन

आकोट/ प्रतीनीधी

शहरातील रघुनंदन निधी स्मॉल बँकेने पत्रकार दिवस तथा जिजाऊ जयंती व स्वामि विवेकानंद जयंती निमित्याने अकोट शहरातील पत्रकारांचा ह्रदयी सत्कार करत पत्रकारीतेचा गौरव केला.आकोटातील लघु उद्योजक आज स्वाभिमानी जीवन जगत आहेत. निधी बँकमुळे लघु उद्योजकांनी प्रगतीच्या नव्या वाटांवर वाटचाल सुरु केली आहे. या प्रगतीच्या रथाची घौडदौड अखंड सुरु राहो,असा मानस उपविभागीय महसुल अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी यावेळी व्यक्त केला.

शनिवार, (ता.12) ला सायंकाळी कोरपे कॉम्प्लेक्स मधील रघुनंदन स्मॉल बँकेच्या आवारात राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना राजपूत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिओम व्यास यांनी भूषविले. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणुन तहसीलदार विश्वनाथ घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तर रघुनंदन निधी लिमीटेड चे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रतिमा पूजन, हारार्पण व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर आयोजक पुरुषोत्तम चौखंडे यांनी रघुनंदन निधी लिमीटेड ची संकल्पना समजावून सांगितली. गत दोन वर्षांपासुन संस्था प्रगती पथावर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. संस्थेने अनेक मराठी व्यवसायीकांना उद्योगासाठी प्रोत्साहन दिले आहे. याप्रसंगी चौखंडे यांनी प्रसिध्दी माध्यमांचे कौतुक केले. ते म्हणाले की न्यायालयाप्रमाणेच पत्रकारांचाही सकारात्मक अंकुश हवा, प्रिंट मिडीयाचे महत्व आजही कायम असून पत्रकारांचा विकासात नेहमीच लेखणीच्या माध्यमाने सहभाग राहीला आहे.

यानंतर शहरातील पत्रकारांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर मान्यवरांचाही स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आकोट तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयकृष्ण वाकोडे तसेच विकास वाटाणे यांचाही सत्कार करण्यात आला. तद्नंतर मान्यवरांच्या भाषणांतर्गत ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर यांनी शांतता ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी रघुनंदन निधी लिमीटेडच्या कर्मचार्‍यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली. यानंतर तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी पत्रकारांच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा वेगाने प्रसार होतो असे सांगून सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले

. उपविभागीय अधिकारी राजपूत यांनी पत्रकारांची लेखणी समाजमनाचा जीवंत आरसा असल्याचे सांगून लेखणीची शक्ती प्रचंड असल्याचे ते म्हणाले. प्रशासन व पत्रकारांचा एकमेकांसोबत सातत्यपूर्ण संवाद असावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संचालन पत्रकार विजय शिंदे यांनी केले. तर आभार मंगेश सपकाळ यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनंदन निधी लिमीटेडचे व्यवस्थापक पुंडलीक रेखाते तसेच मंगेश सपकाळ, संतोष पाथ्रीकर, प्रतिक टवले, विकास वाटाणे, अभिषेक गिते, डॉ.शशिकांत पाथ्रीकर, प्रशांत हिंगणकर, प्रशांत विखे, नंदकिशोर गावंडे, सुधीर जायले, पप्पु शिंदे, चंद्रशेखर तायडे, समिर खांडे, विनोद राऊत, योगेश वाकोडे, निलेश चंदन, बंडुभाऊ सिरसाट, संतोष मिसळे, शरद ताडे, नितीन वानखडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला आकोट शहरातील सर्व पत्रकारांची उपस्थिती होती.

चौकट…
अकोल्याच्या धर्तीवर आकोटमधेही पत्रकार भवनासाठी प्रयत्न करु – उदयसिंह राजपूत
आकोटमधे पत्रकारांच्या हक्काचे एखादे भवन असावे अशी मागणी तालुका पत्रकार संघातर्फे सचिव मंगेश लोणकर यांनी केली. त्याप्रसंगी उपविभागीय महसुल अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी ज्याप्रमाणे अकोल्यात पत्रकार भवन उभारण्यात आले. त्याच प्रमाणे आकोटमधेही पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. असे आश्वासन दिले.