कडेगांव येथे महीला हक्क व सक्षमीकरण कार्यशाळा मोठ्या दिमाखात संपन्न

महाराष्ट्र राज्य महीला आयोग मुंबई व भारती विद्यापीठाचे ग्रामिण विकास प्रतिष्ठान केंद्र सांगली यांचे संयुक्त विद्यमाने भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगांव येथे महीला हक्क व सक्षमीकरण कार्यशाळा मोठ्या दिमाखात संपन्न झाली.या कार्यशाळेचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेच्या महीला व बालकल्याण समितीच्या विद्यमान सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशालीताई कदम, जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौ.शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व कडेगांव पलुस मतदार संघाचे भाग्यविधाते स्व.आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा परिषदेच्या महीला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ.सुषमा नायकवडी म्हणाल्या की,मानवसमुहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे.स्त्रीयांचे जीवनमान उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासुन ते त्यांचा छळ व अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे योग्य वागणुक स्त्रीयांना मिळत नाही हा भेदभाव दुर करून स्त्रीयांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती व सुचालन साधणे यासाठी पुरोगामी व विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टीकोन व केलेली कृती म्हणजे स्त्री सक्षमीकरण म्हणुनच महीलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज असुन सक्षमीकरण करण्यासाठी घटनेने बरेचसे कायदे केलेले आहेत.महीलांना आरक्षण मिळुनही महीला निर्धन व निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.वैद्यकीय सुविधा, पतपुरवठा प्रशिक्षण,नोकऱ्या व राजकारणत पुरूषांच्या तुलनेत स्त्रीयांना कमी संध्या मिळत होत्या त्यामुळे महीला सक्रीय असण्याची शक्यता फारच कमी होती आता महीलांना आरक्षण मिळाल्याने महीलांनी त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.निर्णय क्षमता वाढविणे गरजेचे आहे.राजकारण व नोकरी यामध्ये महीलांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी महीलांनीच पुढे येवुन प्रबोधन केले पाहिजे म्हणुन महीला हक्क व सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे असे जिल्हा परिषदेच्या सभापती डॉ सुषमा नायकवडी यांनी बोलताना सांगितले.यावेळी भारती विद्यापीठ कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुलक्षणा कुलकर्णी, डॉ पुजा नरवाडकर,अॅड.शौर्या पवार,सांगली जिल्हा समन्वयक सौ.अरूणा पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालनताई मोहीते,प्रकल्प अधिकारी कलावती शेस्वरे, नगराध्यक्षा सौ.आकांक्षा जाधव, प्रतिष्ठानचे सचिव प्रा.श्रीकृष्ण मोहीते यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी कडेगांव पंचायत समितीच्या सदस्या सौ.स्मिता महिंद,सुनंदा थोरात,सायली कुलकर्णी,तब्बसुम मुल्ला,सुरेखा तडसरे,मंगला सुर्यवंशीयांच्या सह चारशे महीला उपस्थित होत्या आभार प्रा.सुर्यकांत बुरूंग यांनी मानले