कोंड गावच्या दारूबंदी समितीच्या अध्यक्षपदी- हुकमत मुलाणी यांची निवड

0
1110

कोंड गावच्या दारूबंदी समितीच्या अध्यक्षपदी
हुकमत मुलाणी यांची निवड

उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.१३
उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील “गाव दारूबंदी समितीच्या अध्यक्षपदी”तेथील रहिवासी व पञकारिता क्षेञात असणारे व लेखनीच्या माध्यमातून गावात व परिसरातील वंचितांना न्याय मिळवून देणारे दै. आनंद नगरी चे जिल्हा प्रतिनिधी मा.हुकमत मुलाणी यांची ३०नोव्हेंबरच्या गावातील ग्रामसभेच्या बैठकित सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांचे निवडीचे गावातील विविध नामांकित ग्रामस्थ यांनी स्वागत केले आहे.पञकारिता क्षेञ सांभाळतच गावातील विविध कामासाठी वेळ देणार्या तरूणाची अशा समितीवर निवड झाल्याणे कोंड गावातून समाधान व्यक्त केले जात आहे.
हुकमत मुलाणी यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याणे त्यांचा सर्वच क्षेञात मिञपरिवार आहे.या सर्वच क्षेञातील मिञाकडून त्यांचेवर प्रेम असणार्या व्यक्तीकडून ,उस्मानाबाद परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.त्यांचे निवडीचे सर्वञ कौतूक होत आहे.