कथा, रूढी परंपरेला झुगारून स्वराज्याचे दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ – वसंत मुंडे.

0
766

राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२१वी जयंती पत्रकार भवन येथे उत्साहात साजरी
जिजाऊंचा आदर्श घ्यावा – उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण
भाकड कथा, रूढी परंपरेला झुगारून स्वराज्याचे दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ – वसंत मुंडे.

परळी : 12 राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२१वी जयंती लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परळी शहराचे उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण यांनी राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श वर्तमान नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच काँग्रेस चे ओबीसी नेते वसंत मुंडे म्हणाले की, शुद्रास राजा होण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्या भट शाहीच्या भाकड कथा, रूढी परंपरेला झुगारून स्वराज्याचे दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना स्मरण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी पत्रकार मोहन व्हावळे, प्रेंमनाथ कदम, प्रा. प्रवीण फुटके, पोलीस समाधान भाजीभाकरे, सुकेशिनी नाईकवाडे, बाबा शेख, महादू गित्ते, संभाजी मुंडे, दशरथ रोडे, मेहबूब कुरेशी, शेख मुकरम, अमर रोडे, सरडे मामा, अनिस चे शहराध्यक्ष विकास वाघमारे, नवनाथ दाने, आकाश सावंत, अविनाश साळवे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवान साकसमुद्रे यांनी केले.