उस्मानाबाद जिल्हयातील क्राईम बातम्या; वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 98 लोकांवर कारवाईसह ,चोर्या ,मारहाण

0
734
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 98 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 12/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 98 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 20 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

3

उस्मानाबाद येथे दोन मोटारसायकलचा अपघात

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 26/12/18 रोजी 12.00 वा. सु. रामनगर येथील पोलीस लाईन जवळ रोडवर मनोज सुधाकर ढवळशंख रा. शिंगोली ता. जि. उस्मानाबाद व त्याचा मित्र हे मोसा क्र एम एच 25 ए पी 3930 वरुन उस्मानाबाद हुन शिंगोली कडे जात असताना अज्ञात मोटारसायकल चालकाने पाठीमागुन मनोजी सुधाकर ढवळशंख्‍ याचे मोटारसायकला कट मारल्याने मनोज ढवळशंख व त्याचा मित्र खाली पडुन मनोज ढवळशंख याचे डोक्यास जबर मुकामार लागला म्हणुन मनोज सुधाकर ढवळशंख याचे फिर्यादवरुन अज्ञात मोटारसायकल चालकाचे विरुध्द दिनांक 12.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 134 (अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापुर येथे मोबाईलची चोरी

पोलीस स्टेशन तुळजापुर :- दिनांक 20.11.18 रोजी 13.00 वा. सु. कैलास हॉटेलच्या बाजुस दिपक चौक तुळजापुर येथे किरण भगवानराव जाधव रा. नळदुर्ग ता. तुळजापुर हे दोन दिवसापुर्वी दुरुस्त करण्यासाठी टाकलेले कुलुप आणण्यासाठी गेला असता कुलुप दुरुस्त न झाल्याने तेथेच थांबला त्यावेळी किरण जाधव यांचे वरच्या खिशातील नोकीया कंपनीचा मोबाईल 6.1 जु. वा. किं अ. 12 हजार रु. चा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. म्हणुन किरण भगवानराव जाधव यांचे फिर्यादवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.01.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे भा.दं.वि चे कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे पत्र्याच्या शेडची चोरी

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 08.03.17 रोजी 10.00 ते दिनांक 11/01/19 रोजी 15.00 वा चे दरम्यान भाऊसाहेब हरिभाऊ अणदुरकर रा. उंबरे कोटा ता.जि. उस्मानाबाद यांचे मालकीचे 15 हजार रु. किमतीचे पत्र्याचे शेड सर्वे नं 99 मधील जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण संस्था पाणी फिल्टर टाकीचे समोर उस्मानाबाद येथुन भाऊसाहेब हरिभाऊ अणदुरकर यांचे मालकीचे प्ल्ॅट क्र 8 मधुन चोरीस गेले आहे. सदरचे शेड जिवन नरसिंग राठोड रा. तेरणा कॉलेजच्या पाठीमागे उस्मानाबाद याने चोरुन नेले असुन ते 11.01.19 रोजी जिवन नरसिंग राठोड याचे कडे दिसुन आले म्हणुन भाऊसाहेब हरिभाऊ अणदुरकर यांचे फिर्यादवरुन जिवन नरसिंग राठोड याचे विरुध्द दिनांक 12.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथे मागील भांडणाच्या कारणावरुन मारहान

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 09.01.19 रोजी 00.30 वा ते 01.00 वा चे दरम्यान स्मशान भुमी जवळ कोरेगाव रोड उमरगा येथे नरेंद्र ज्ञानोबा काळे रा. माडज ता. उगरगा यास सुरेश गणपत जाधव याने तुझा भाऊ जित्या कोठे आहे काल त्याने माझे बरोबर भांडण तक्रारी केली आहे असे म्हणला त्यावेळी नरेंद्र काळे याने मा
झा भाऊ घरी असेल असे म्हणला त्यावेळी सुरेश जाधव व त्याचे सोबतचे तीन अनोळखी लोकांनी नरेंद्र काळे यास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांने , काठीने मारहान करुन सुरेश जाधव याने त्याचे हातातील काठीने नरेंद्र काळे यास जबर मारहान करुन दुखापत केली व डावे हातास मनगटाचे वर हाड फॅक्चर झाले असुन डोकयास टाके पडले आहेत. म्हणुन नरेंद्र ज्ञानोबा काळे याचे फिर्यादवरुन सुरेश गणपत जाधव व त्याचे सोबतचे तीन अनोळखी इसमाविरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 325,324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

मुरुम येथे पोलीस अधिकारी हे शासकीय काम करीत असताना मारहान

पोलीस स्टेशन मुरुम :- दिनांक 12.01.19 रोजी 14.29 वा. सु. गणेश श्रीपतराव झिंझुर्डे पो. पोलीस उपनिरीक्षक पो. स्टे मुरुम हे बसस्थानक मुरुम येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना वैभव रोहीदास वाघ याने त्याचे ताब्यातील मो. सा क्र एम एच 25 ए ई 4511 ही मुरुम बस स्टँड मधील एस टी बसेस ला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने लावलेली असल्याने गणेश श्रीपतराव झिंझुर्डे पो. पोलीस उपनिरीक्षक हे वाहतुक सुरळीत करीत असताना वैभव वाघ यास त्याचे ताब्यातील मो. सा. कडेला घे असे म्हणाले असता वैभव वाघ याने तु कोण सांगणार मी गाडी बाजुला घेत नाही असे म्हणाला त्यावेळी बाजुला बस ची वाट पाहत असलेले वैभव वाघ याचे वडील रोहीदास वाघ यांनी येवुन बाकीचे मोटारसायकल दिसत नाहीत का मी एक्स सर्व्हीस मॅन आहे असे बोलुन गणेश श्रीपतराव झिंझुर्डे पो. पोलीस उपनिरीक्षक यांचे गच्चीस पकडले व रोहीदास वाघ व वैभव वाघ यांनी गणेश श्रीपतराव झिंझुर्डे यांना चापटा मारल्या गणेश श्रीपतराव झिंझुर्डे पो. पोलीस उपनिरीक्षक यांनी वैभव रोहीदास वाघ् यास त्यांची मो सा घेवुन पोलीस स्टेशनला चलण्याबाबत सांगीतले असता त्याने मो सा घेवुन गणेश श्रीपतराव झिंझुर्डे पो. पोलीस उपनिरीक्षक हे त्याचे मो सा वर बसले असता त्याने त्याचे ताब्यातील मो सा इतराचे जिवीतास धोका निर्माण होईल व व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल अशा पदध्तीने मो सा हयगई ने व‍ निष्काळजीपणे चालवली म्हणुन गणेश श्रीपतराव झिंझुर्डे पो. पोलीस उपनिरीक्षक यांचे फिर्यादवरुन वैभव रोहीदास वाघ व रोहीदास वाघ यांचे विरुध्द दिनांक 12.01.19 रोजी पोलीस स्टेशन मुरुम येथे भादंविचे कलम 353,332,336,279,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहारा येथे शांततेचा भंग केला म्हणुन गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन लोहारा :- दिनांक 12.01.19 रोजी 1) दिपक शिवाजी सोनकांबळे व 1 महिला दोघे रा. बेंडकाळ 3) उत्तम रंगनाथ भालेराव व एक महिला दोघे रा. मार्डी ता. लोहारा हे एकमेकाच्या विरोधात तक्रार नेांद करण्यासाठी पोलीस स्टेशन लोहारा येथे आले असताना त्यांनी आपआपसात ऐकमेकांशी झोंबाझोंबी करुन मोठमोठयाने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 12.01.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंवि चे कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापुर नाका उस्मानाबाद येथे भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 12.01.19 रोजी 10.00 वा सु हंबीरे पंपासमोर तुळजापुर नाका उस्मानाबाद येथे गणेश हनुमंत मंजुळे रा. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र एम एच 13 बी एच 3566 ही हयगईने निष्काळजीपणे चालवुन येणारे जाणारे लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत चालवित असताना मिळुन आला त्याचे कडे ड्रायव्हींग लायसन्स व गाडीचे कागदपत्र चेक केले असता मिळुन आले नाहीत म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 12.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279 सह मो वा का चे कलम 130 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढोकी येथे शांततेचा भंग केला म्हणुन गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 12.01.19 रोजी 23.00 वा. सु निकलेश गंगाधर अदमाने रा. वाल्मीक नगर बजाज शोरुमचे पाठीमागे लातुर. जि. लातुर याने मद्यार्काचे सेवन करुन मद्यार्काचे अमलाखाली राहुन पोलीस स्टेशन ढोकी येथे आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे मु.प्रो.का चे कलम 85(1) सह मपोका चे कलम 110/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावाहन चालकावर गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन शिराढोण :- दिनांक 13.01.19 रोजी 12.45 वा. सु. शिराढोण ते कळंब जाणारे रोडवर शिराढोण टी पॉईंट येथे प्रदीप अशोक नरवडे रा. पिंपरी ता. कळंब जि. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील बजाज कंपनीचा ॲपे क्र एम एच 25 ए 1117 हा सार्वजनिक रोडवर धोकादायक रित्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभा करुन रोडने येणारे जाणारे वाहनांना अटकाव होवुन ईजा होईल अशा स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.