बहिरम येथे भाविकांची गर्दी ,मात्र पोलिसांची नागरिकांना उद्धटपणाची वागणूक, 1 किलोमीटर वाहनांची रांग,पोलीस प्रशासन नियोजनात अपयशी

0
1289
Google search engine
Google search engine

बहिरम येथे भाविकांची गर्दी ,मात्र पोलिसांची नागरिकांना उद्धटपणाची वागणूक, 1 किलोमीटर वाहनांची रांग,पोलीस प्रशासन नियोजनात अपयशीki

चांदुर बाजार :-

विदर्भातील महाजत्रा म्हणून प्रसिद्धी प्राप्त असलेली सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बहिरम यात्रे मध्ये रविवार दिनी अल्लोट गर्दी पाहायला मिळाली.दुपारी 1 पर्यत भाविकांची गर्दी कमी होती. मात्र अचानक गर्दी वाढल्याने पोलिसांचे नियोजन सुद्धा कमी पडले असल्याचे दिसून आले.बहिरम वरून परतवाडा जाणार मार्ग कारंजा बहिरम मार्गे वळविले असल्याने वाहतूक सुरळीत होती.मात्र पोलिस विभाग आज रविवार असून सुद्धा बसल्या जागीच आपली ड्युटी करीत असल्याने आणि ठाणेदार मुकुंद कवाडे त्याच्या शासकीय वाहनातून पेट्रोलीग करीत असताना सुद्धा दुपारी 4 च्या दरम्यान भाविकांना सुमारे 45 मिनिट पर्यत वाहनांच्या रांगेत त्रास सहन करावा लागला.मात्र या वेळी पोलिसांच्या ऐवजी सामान्य नागरिकांना वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना मदत केली.

मागील वर्षी रिगण सोहळा हा रविवारी असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती.त्यावेळेस सुद्धा पोलिस विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.त्यामुळे यावर्षी रिगण सोहळा हा 17 जानेवारी गुरुवारी येत असून नौकर दार वर्ग जरी सुट्टी नसल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही मात्र परिसरातील भाविकांची गर्दी मात्र नक्की राहणार या दरम्यान पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा कशाप्रकारे नियोजन करणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.मागील वेळेस जिल्हा प्रशासनाने झालेल्या गैरसोय लक्षात घेता यावर्षी योग्य नियोजन केले.मात्र पोलीस विभाग कोठे तरी कमी पडले असल्याचे बोलले जात आहे.

बहिरम वरून मार्ग वळविण्यात आला असल्याने यात्रे मध्ये फक्त मोटरसायकल स्वार यांना प्रवेश होता मात्र आपली बसून ड्युटी करणारे अधिकारी हे सामान्य नागरिकाना उर्मटपणाची वागणूक देत होते.त्यामुळे यात्रेमधून खमंग भाजी बरोबर पोलीस प्रशासन बाबत नाराजी चा सुद्धा दूर निघत आहे.

बॉक्समध्ये
आजही दिला जातो बळी………….
*पूर्वी या ठिकाणी आपला नवस पूर्ण झाल्यावर बळी देण्याची प्रथा होती.मात्र ती आजही या ठिकाणी कायम असल्याची दिसत आहे.बळी देण्यापूर्वी बोकड याची मंदिरात आणून पूजा केली जाते नंतर त्याचा बळी दिला जातो..*