राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करा ―प्रा.टी. पी.मुंडे सर

0
1983

परळी: नितीन ढाकणे
राष्ट्रसंत भगवान बाबा हे एकट्या वंजारी समाजाचे च नव्हे तर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे
रविवारी संध्याकाळी अहमदनगर येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली बाबांची ही तीच मूर्ती आहे जिची प्राणप्रतिष्ठापना भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे करण्यात येणार होती काल सायंकाळी काही समाजकंटकांनी श्रद्धेय भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा निंदनीय घटनेचा प्रा टी पी मुंडे सर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे
या घटनेतून भगवान बाबांच्या लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत आरोपी कोण आहेत हे माहित असताना सुद्धा सरकार अटक करत नाही हे सरकारचे अपयश आहे राष्ट्रसंत भगवान बाबा हे महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे अहमदनगर येथे घडलेल्या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करावी त्यांच्याविरुद्ध समाजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी दिला आहे या घटनेने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत याची किंमत सरकारला मोजावी लागेल असेही ते म्हणाले.