राज्यस्तरीय दीर्घ निबंध स्पर्धेत मंदाकिनी सपकाळ प्रथम जेष्ठ साहित्यीक नागनाथ कोत्तापल्ले , उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत झाला सत्कार

0
1965
Google search engine
Google search engine

सांगली न्युजकोल्हापूर येथील निर्मिती विचारमंचने आयोजित केलेल्या ‘महामानवांचे जीवन व कार्य ‘ या विषयावरील राज्यस्तरीय दीर्घ निबंध स्पर्धेत देवराष्ट्रे ( ता. कडेगाव ) येथील सौ. मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ यांच्या ‘ आण्णा भाऊ साठे – जीवन व कार्य ‘ या विषयावरील निबंधास प्रथम क्रमांक मिळाला. दहा हजार रुपयांची पुस्तके व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. या निबंधाचे संवाद प्रकाशनकडून पुस्तक प्रकाशित होणार आहे .कोल्हापूर येथील शाहू स्मारक मध्ये झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ साहित्यीक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे हस्ते व उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. सपकाळ यांचा सत्कार झाला.कोल्हापूर येथील निर्मिती विचारमंचने ऑक्टोबरमध्ये या स्पर्धा घेतल्या होत्या.स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. महामानवांचे जीवन व कार्य या विषयावरील दीर्घ निबंध स्पर्धेत छ. शिवाजी महाराज , शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , जोतीराव फुले , सावित्रीबाई फुले , आण्णाभाऊ साठे , नाना पाटील आदी वीस महामानवांचा यामध्ये सामावेश होता. स्पर्धेसाठी दहा हजार शब्दांची शब्दमर्यादा होती. प्रत्येक विषयातील प्रथम क्रमांकास दहा हजार रुपयांची पुस्तके व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. तर प्रथम क्रमांकप्राप्त निबंध संवाद प्रकाशनकडून पुस्तक रुपात प्रकाशित करण्यात येणार आहे. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला .सौ. सपकाळ या जीवन विकास संस्था तासगाव संचलित नागठाणे ( ता. पलूस ) येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी आण्णा भाऊ साठे – जीवन व कार्य या विषयावर निबंध सादर केला होता. त्यांच्या निबंधास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कोल्हापूर येथील छ.शाहू स्मारक भवनमध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते व उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार झाला. यावेळी प्रा. करूणा मिणचेकर , प्रा. चिंतामणी कांबळे , अलोक जत्राटकर , अनिल म्हमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.फोटो :कोल्हापूर : येथील शाहू स्मारकमध्ये राज्यस्तरीय दीर्घ निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सौ. मंदाकिनी सपकाळ यांचा सत्कार करताना जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले .शेजारी साहित्यिक उत्तम कांबळे , प्रा. करुणा मिणचेकर , प्रा. चिंतामणी कांबळे , अलोक जत्राटकर आदी.