दिव्यांग गिर्यारोहक धिरज कळसाईत,कर्तव्यनिष्ठ ठाणेदार गजानन शेळके यांचा ह्रदयी सत्कार

0
1349
Google search engine
Google search engine

नयन संस्थेसह विविध महीला संघटनाचे आयोजन

आकोट/ता.प्रतीनिधी

सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ जयंती उत्सवनिमित्य शहरातील नयन बहुऊद्देशीय संस्थेच्या पुढाकारात प्रबोधनपर व्याख्यान व कार्यगौरव समारंभ दि.13 जाने.ला स्थानिक नवयुग वाचनालयात उत्साहात पार पडला. या विचार जागर कार्यक्रमात दिव्यांग आसतांनाही कळसुबाई शिखर सर केलेला व आफ्रीकेच्या टांझानियातील शिखर सर करण्यास सज्ज असणाऱ्या गिर्यारोहक धिरज कळसाईत, कर्तव्य निष्ठेने सामजिक जाणीव ठेवुन,सर्व सामान्य जनते सोबतच महिलांना मान,सन्मान,देत जननी सारखे उपक्रम राबवणारे कर्तव्यनिष्ठ ठाणेदार गजानन शेळके यांचा सपत्निक ह्रदयी सत्कार करण्यात आला

.

सर्वप्रथम सावित्रीबाई फुले,माँ जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन करुन त्यांना हार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष सामजिक कार्यकर्ते मोहन आसरकर हे होते.तर पोलिस निरिक्षक गजानन शेळके ,सौ प्रीती गजानन शेळके ,मालती देशमुख ,डॉ.गुंजन वालसिंगे ,जिजाताई देशमुख,डॉ मनिषा मते आदींची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.पाहुण्यांचे स्वागत बुके व पुष्प देवून करण्यात आले.
स्वागत पश्चात युवा व्याख्याता मोनिका काळे यांचे जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे जिवनकार्यावरील व्याख्यान झाले.

सवेंद्ंनशील अकोट शहरात रुजू झाल्यावर
समजात शांतता व सलोखा निर्मान करत लोकोपयोगी पोलीसिंग करणारे ठाणेदार गजानन शेळके यांचा मोहन आसरकर व आयोजक संस्थांच्या वतीने कार्यगौरव सत्कार करण्यात आला.तसेच सौ प्रीती शेळके यांचा सुनिता चायल व भैरवी हींगणकर यांच्या हस्ते साडी,चौळी,व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. दिव्यांग
गिर्यारोहक धीरज कळसाईत याला माउंट येवरेस्ट सर करण्याकरिता आर्थिक मदत देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्याला नयन संस्था ,शिक्षक साहीत्य संघ. व डॉ.गुंजन
वालशिंगे याचे कडुन आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी भुमिचे अध्यक्ष तुषार अढाऊ व सचिव चंचल पितांबरवाले यांच्यावरील कवितांची विशेष फ्रेम कवयत्री सुनिता चायल यांनी भेट दिली.
यावेळी प्रस्ताविक शिक्षक साहीत्य संघाचे प्रा.कैलास पवार ,संचालन नयन बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता चायल,व आभार प्रदर्शन रंजना मोरे यानी केले.
कार्यक्रमाला नयन संस्थेच्या सुशिला
चापाये ,ममता तंवर,गिता तंवर,देवका बुंदेले,अर्चना बरर्बरे ,संजीवनी
कुरवाडे ,संगीता कुरवाडे,सवीता कुरावाडे
निर्मला नवघरे व कल्पना नवघरे ,संगीता ,सुधा रघुवंशी ,मंजू झाडोदीया ,व सदस्य उपस्थित होत्या,

वार फाऊंडेशनच्या भैरवी हींगणकर ,अर्चना काळे,माधवी सोनखासकर,मंजूषा टेमझरे,जेसिआय अकोट एंजल सिटीच्या कांता राठी ,लता रेखाते,व सर्व सदस्य ,भूमि फाऊंडेशनच्या चंचल पितांबरवाले ,सुदाम राजदे,योगेश वर्मा ,अक्षय जायले, व भुमीटिमसह बहुसंख्य महीलांची उपस्थीती होती.