जरुड येथे रविवारी पालकांना मिळणार त्यांच्या बाळाच्या सर्वांगीण विकासाच्या टिप्स — नागपूर येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण खापेकर करणार मार्गदर्शन — बाळांच्या तपासणी करून करणार सवलती दरात औषध पुरवठा !

0
1598

जरुड येथे रविवारी पालकांना मिळणार त्यांच्या बाळाच्या सर्वांगीण विकासाच्या टिप्स

— नागपूर येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण खापेकर हे करणार मार्गदर्शन

— बाळांच्या तपासणी करून करणार सवलती दरात करणार औषध पुरवठा

विशेष प्रतिनिधी /

वरुड तालुक्यातील जरुड येथे लहान मुलांचा सर्वागीण विकास कसा करावा, त्याच्या पोटात असेपासून जन्मानंतर व तो मोठा होता असतांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांचे उतर देण्यासाठी नागपूर येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण खापेकर हे पालकांना रविवारिऊ ( ता. २० ) काही टिप्स देऊन त्यांच्या बाळांची आरोग्य तपासणी करून रोगनिदान करणार आहे व आवश्यक औषध सवलतीच्या दरात सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नागपुर आस्था चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आणि स्व. श्री. नामदेवराव वानखड़े स्मृति क्लिनिक अँड केअर सेंटर (डॉ. नितिन व डॉ. नेहा वानखड़े) व जरुड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने डॉ. प्रवीण खापेकर (एम.डी.) नवजात शिशु व बालरोग तज्ञ तर्फे निःशुल्क आरोग्य सेमिनार आणि तपासणी व रोगनिदान शिबिर रविवारी ( ता. २० ) सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यन्त उत्क्रांति हायस्कूल, जरूड येथे आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनार व आरोग्य शिबिर मध्ये स्वस्थ व सुदृढ बाळाच्या निर्माणकरिता सम्पूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल तसेच बाळाचा मानसिक व शारीरिक विकासाकरिता सम्पूर्ण माहिती सुद्धा दिल्या जाईल.

आणि या निशुल्क आरोग्य शिबिरात मुलांचे सामान्य आजार, वजन, उंची कमी असणे, बाळ वारंवार आजारी पड़ने, ऑपेरशनच्या समस्या व नवजात बाळाची संपूर्ण तपासणी केल्या जाईल तसेच या शिबिरात मुलांच्या विकासात मदत करणाऱ्या औषधी सवलत दरात उपलब्ध केल्या जातील. बाळाच्या विकासाच्या दुर्ष्टीने काय आवश्यक आहे व काय नाही याबाबत संपूर्ण मार्गदर्शन डॉ खापेकर करणार आहे. तरी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहुन आरोग्य सेमिनार आणि तपासनी व रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा. असे आव्हान आयोजकांनी केले आहे.