कडेगांव मधील युवा मंडळे,महीला मंडळे सामाजिक बांधिलकी जपण्यात अग्रेसर

Google search engine
Google search engine

ुध्दीमत्ता,विचारशक्ती,भावना या मनुष्याला मिळालेल्या देणग्या आहेत.त्याचा वापर योग्य तऱ्हेने, योग्यवेळी,योग्य ठीकाणी करणे अपेक्षित आहे.नाहीतर इतर प्राणीमात्रात आणि मनुष्यात फरकच उरणार नाही.यातुन जर मनुष्य सत्प्रवृत्त असेल ,निदान त्यांच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते त्यातुनच झालेली कृती म्हणजेच समाज बांधीलकी होय.अशीच समाज बांधीलकी जपणारे प्रफुल्ल कुलकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत असाच एक उपक्रम कडेगांव येथे राबविण्यात आला.त्यांचा मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कडेगांव येथील ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेच्या ५०ते१०० विद्यार्थ्यांना थंडीची लाट लक्षात घेता ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.त्याच बरोबर वही पेन विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. विशेष म्हणजे दत्त नागरी पत संस्थेचे माजी चेअरमन यांनीही अशीच सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेस विद्यार्थ्यांना राहण्यासाठी गेली तीन वर्षे दत्त मंगल कार्यालय मोफत दिले आहे.विशेष म्हणजे सध्या कडेगांव मध्ये सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष असिफ तांबोळी,योध्दा मंडळाचे संस्थापक आप्पासाहेब चव्हाण,मैत्री प्रतिष्ठानचे शंकर नायकवडी,संकल्प प्रतिष्ठान चे विजय भोसले महीलांचे रूद्राक्षा फौडेशन च्या काजल हवलदार इत्यादी मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी व महीला मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कडेगांव तालुक्यात जोमाने कार्य करीत आहेत.सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व प्रबोधन करण्यात कडेगांव तालुक्यात या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तितकेच अग्रेसर आहेत व हीच खरी काळाची गरज आहे.एकंदरीत हळुहळू का होईना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे चित्र युवकांच्यात व महीलांच्यात रूजवण्यात ही मंडळे यशस्वी होताना दिसत आहेत. यावेळी ज्ञानमंत्र शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प.गणेश डांगे,दत्त नागरी पत संस्थेचे माजी चेअरमन संतोष डांगे, नगरसेवक नितिन शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी शिवसेनेचे कडेगांव माजी शहराध्यक्ष मुकुंद कुलकर्णी,विजय जाधव,अजित नांगरे ,ठाणे महापौर केसरी विजेता पै.अमोल डांगे,रघुनाथ गायकवाड, शशिकांत रास्कर शंकर नायकवडीमहेश जावीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आभार अजित नांगरे यांनी मानले