सेदानी इंग्लिश स्कूलच्या बॉटनिकल गार्डन व कॉम्प्युटर लॕबचे उद्घाटन

0
765
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतिनिधी

स्थानिक पोपटखेड मार्गावरील लेट दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या बॉटनिकल गार्डन व कॉम्प्युटर लॕबचे मान्यवरांच्या हस्ते दिनांक 17 जानेवारीला उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला उद्घाटक संदीप मालवे ( B.E.O.) हे लाभले होते तर प्रमुख अतिथी नरेंद्र केदार ,संस्था संचालक सुरेश सेदानी,प्रिंसिपल विजय भागवतकर व संस्था अध्यक्ष स्मिता सेदानी यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती लाभली होती.

दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच मान्यवरांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर शाळा परिसरातील बॉटनिकल गार्डन चे तथा विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठीच्या सुसज्ज कॉम्प्युटर लॕबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक संदीप मालवे यांनी विद्यार्थ्यांना कॉम्पुटर युगातील माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा तसेच तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन केले.तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग घेतला तर तो सर्वोत्तम वरदान आहे असे त्यांनी बोलतांना सांगीतले.

यानंतर संस्थाध्यक्ष स्मिता सदानी यांनी विद्यार्थ्यांना बॉटनिकल गार्डन कॉम्प्युटर लॕबच्या सुविधेचा लाभ घेत आपला व संस्थेचा नावलौकिक करण्यास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कार्यक्रमाला माध्यमिक मुख्याध्यापक प्रशांत मंगळे प्राथमिक मुख्याध्यापिका स्नेहल अभ्यंकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमिल शेख व आभार प्रदर्शन अमोल पिंजरकर यांनी केले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थीती होती.