आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा एका दिवसाची वाढ – ‘त्या मनपा नगरसेवकाला आज हजर होण्याचे आदेश

0
997

 मृतक अनिस मोहम्मद

चांदूर रेल्वे येथील टिंग्या हत्या प्रकरण 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       जुन्या आपसी वादातुन शुक्रवारी (ता. ११) झालेल्या शहरातील हत्या प्रकरणात सर्व ६ आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
       चांदूर रेल्वे – अमरावती मार्गावरील चमकुरा ढाब्यावर झालेल्या  अनिस मोहम्मद उर्फ टिंग्या नूर मोहम्मद (२९) या हत्या प्रकरणात सर्व ६ आरोपींना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर चांदूर रेल्वे न्यायालयात पुन्हा गुरूवारी आरोपींना हजर केले असता आरोपींच्या पोलीस कोठडीत १८ जानेवारी म्हणजेच एका दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात नईम खान रहेमान खान, सतिश अनंत कावरे, राहुल मधूकर सहारे, चेतन बाबाराव चित्रीव, शेख जाकीर उर्फ गोलु शेख नासीर व राहुल बच्चनलाल कनासीया या ६ आरोपींना अटक केली आहे.

‘त्या मनपा नगरसेवकाला आज हजर होण्याचे आदेश

    सदर हत्या प्रकरणात अमरावती महानगर पालीकेच्या एका माजी उपमहापौर तथा सद्याच्या नगरसेवकाला नोटीस बजावुन आज १८ जानेवारीला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले असुन त्याचा या प्रकरणात सहभाग होता की नाही याची चौकशी करणार असल्याचे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांनी सांगितले.