प्रहारने केले नगरपरिषदेच्या घंटागाड्यांचे प्रतिकात्मक पुजन व लोकार्पण

0
1105

आकोट/ता.प्रतीनीधी

शहरात स्वच्छता मोहीम सुरु असतांनाही जवळपास गेल्या महीनाभरापासुन नवीन घंटागाड्या या पालीका आवारात लोकार्पणाच्या प्रतिक्षेत उभ्या आहेत.या गाड्या पालीका आवारात दाखल होताच काहींनी नागरीकांना घंटागाड्यांच्या स्वच्छतेचे स्वप्न ही दाखवले होते.मात्र नागरीकांच्या स्वप्नाची होणारी ही थट्टा बघुन अखेर प्रहारने काल दि.१८ जाने.ला नगरपरिषदेच्या घंटागाड्यांचे पुजन करुन प्रतिकात्मक लोकार्पण केले.

अनेक नगरपरिषदे मध्ये घंटागाड्या स्वच्छता कामी असतांना.आकोट नगरपरिषदेत मात्र घंटा गाड्या ह्या लोकार्पनासाठी उभ्या दिसत आहेत.शहरात स्वाईन फ्लु ने दोघा जणांचा जीव गेल्याची शक्यता व्यक्त केल्या जात असतांनाही.एक महिन्यान पासुन या घंटागाड्या लोकार्पणाच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत.अखेर शहरातील स्वच्छतेच्या बाबतीतील या तांत्रीक दिरंगाईचा प्रहारने आज समाचार घेतला.

यावेळी प्रहारचे
जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर , जिल्हाउपप्रमुख निखील गावंडे , शहरप्रमुख सागर उकंडे , शहर कर्याध्यक्ष विशाल भगत , कीशोर देशमुख , राजू ढोले , बंडूभाऊ शिरसाट , दिपक नाहाटे ,अचल बेलसरे , संदीप मर्दाने , रितेश हाडोळे ,निखील दौड , रूशीकेश हरने ,समीर जमदार श्रीकांत गावंडे यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.असे प्रहारच्या वतीने कळवण्यात आले.