‘विजय काटोले’ यांची शेगांव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदी निवड

0
708

शेगांव :- येणाऱ्या लोकसभा निवडणूक पाहता सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहे मागील निवडणूकित काँगेस पक्षाचा पराभव झाला होता मात्र आता काँगेस पक्षाचा लहान-मोठा कार्यकर्ता पक्षाची बांधणी करीत आहे.
दिनांक 16 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाची लोकसभा मतदारसंघाची बुलढाणा जिल्हा निवड मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,आमदार हर्षवर्धन सपकाळ नेते लक्ष्मणराव घुमरे,सतीश मेहेत्रे ईतर कार्यकर्त्यांची उपस्तीती होती या बैठकीमध्ये शेगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी विजय काटोले यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार राहूल बोन्द्रे यांनी विजय काटोले याचा नियुक्तीबद्दल तिरंगा दुपट्टा देऊन सत्कार केला व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. कार्यक्रमादरम्यान संघटनेने दिलेली काम पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी पार पाडून कॉग्रेस पक्ष बळकटीसाठी कार्य करावे असे आ.राहुल बोन्द्रे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. नंतर सर्व उपस्तीत मान्यवारांनी विजय काटोले यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.