भारिपच्या विजय संकल्प संवाद यात्रेचे आकोटात आगमन

0
1574
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतिनिधी

भारिप-बहुजन महासंघाच्या विजय संकल्प संवाद यात्रेचे आज दिनांक 19 जानेवारीला शहरात आगमन झाले स्थानिक शासकीय विश्रामगृहावर पक्षााच्या कार्यकर्ता पदाधिकारींनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले यावेळी यात्रेतील संवादरथ हा कार्यकर्त्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला होता 10 जानेवारीपासून सुरू झालेली ही यात्रा तेल्हारा तालुक्यातील दौरा पूर्ण करून आज अकोट शहरात दाखल झाली.

या यात्रेच्या स्वागत प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे ,संवाद यात्रेचे प्रचारक आदेश आटोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत पक्षाचे विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. संवाद यात्रा आयोजनासंदर्भात आटोटे यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली तर प्रास्ताविक मांडणी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केली प्रदीप वानखडे यांनी गल्ली ते दिल्ली असणाऱ्या एकछत्री राज्य कर्त्यांनी चालवलेल्या सत्तेच्या राज्यकारभाराच्या गोंधळाचा समाचार घेतला यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले. अकोट तालुक्यात विकास कामे होत नाहीत मतदारसंघातील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत.विम्याचे पैसे नाहीत आकोट तालुका दुष्काळग्रस्त घोषीत नाही, शहरातील विकास कामे नाहीत. या सर्व समस्यांविरोधात पक्ष विविध मार्गाने लढा देत आहे. जनसामान्यांच्या समस्या ऐकून राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचे त्यांनी सांगीतले. यापुढेही पक्ष असाच लढत राहील असे त्यांनी सांगीतले.

याप्रसंगी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी जमील पटेल,हरीभाऊ वाघोडे ,काशीराम साबळे दीपक बोडखे, शरीफ राणा गाजी पटेल ,रामदास मांडवे सदानंद तेलगोटे, संदीप आग्रे,रमेश आकोटकर ,केशवराव बिलेबिले, कांतीराम गहले , संजय कासदे,पांडुरंग तायडे, स्वप्निल वाघ, गौतम पचांग ,निलेश शिरसाठ,प्रसिद्धी प्रमुख स्वनिल सरकटे,अमोल गावंडे,महीला आघाडीच्या सुनिता हेरोळे, याच्यासह बहुसंख्य महीला व पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.