मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात “स्वाभिमानी” चा दणका…अनोख्या वरातीने व विवाहाने नागपुरकरांचे वेधले लक्ष…

0
1312
Google search engine
Google search engine

रविकांत तुपकरांची पोलिसांशी जोरदार बाचाबाची…

अखेर मुख्यमंत्र्यांनी ना. बावनकुळेंना आंदोलनस्थळी पाठवले.

विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्र आज दुष्काळामुळे होरपळत आहे.. अशा परिस्थितीतही सरकार कोणत्याही उपाययोजना करन्यास तयार नाहीए.. म्हणुन अशा सरकारला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाब विचारण्यासाठी स्वाभिमानीच्या वतिने *”कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात”* या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भातील प्रातिनिधिक स्वरूपात शेकडो शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराकडे धडक दिली…

मोर्चास्थळापासुन मोर्चेकर्यांनी वाजत गाजत बँन्डच्या तालावर वर्हाडी ठेका धरला… सजुन आणलेले नवरदेवाला वडिलांचे कर्ज मानगुटीवर आहे अन् नवरीच्यांइकडची परिस्थितीही अशीच असल्याने नवरीला झोप सुध्दा लागत नाही मग आता लग्नानंतर ही अशा हालाखीच्या परिस्थितीत आम्ही आमचा भावी संसार कसा करावा इतकी भिषण परिस्थिती असताना हे सरकार इतके निर्ढावलेले कसे असु शकते असा सवालंच पालकमंत्र्यांना नवरदेवाने व नवरीने केला..

ही वरात जिथे अडवली तिथेच या नवरदेव नवरींचा प्रतिकात्मक विवाह सोहळा सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या व मंगलाष्टकांच्या मंजुळ आवाजात हा नाविन्यपूर्ण विवाह सोहळा पार पडला.. या विवाह सोहळ्यानंतर आलेल्या सर्व वर्हाडी कम् मोर्चेकर्यांसाठी सुग्रास अशा भोजनाची व्यवस्था करन्यात आली होती.. जमलेल्या सर्व वर्हाड्यांनी बसल्या ठिकाणीच जेवणासाठी बैठक मांडली… शेतकर्यांच्या समस्या सोडवन्यात सपशेल अपयशी ठरलेले हे सरकार आहे हे आलेल्या शेतकर्यांच्या चेहर्यावर व त्यांनी सरकारप्रती व्यक्त केलेला रोष स्पष्ट जाणवत होता…

शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित ह्या अनोख्या वरातीमुळे नागपुरातील पोलिस व प्रशासन चांगलेच हादरले.. शेतकर्यांच्या या आंदोलनातील प्रखरता ओळखुन मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाठविले.. पालकमंत्र्यांनी मोर्चास्थळी भेट देवुन चार दिवसाच्या आत नागपुरात या संदर्भात मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावु असे ठोस आश्वासन दिले… यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी ‘आठ दिवसाच्या आत हे प्रश्न जर सोडविले गेले नाही तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असनार्या “रामगिरी” बंगल्याचा अचानक ताबा घेवु’ असा इशारा दिला… मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करन्यात आले.. मात्र यावेळी रविकांत तुपकरांच्या कल्पकतेतुन या आंदोलनात झालेलं अनोखं लग्न जणू सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला होता एवढं मात्र नक्की..
यावेळी माजी केंद्रिय मंत्री व स्वाभिमानीचे नेते सुबोधजी मोहिते, स्वाभिमानीचे प्रांताध्यक्ष प्रकाशजी पोफळे सर, विदर्भप्रमुख देवेंद्र भुयार,दयाल राऊत व या मोर्चाचे नेटके नियोजन वाशिम जिल्हाध्यक्ष दामोदरजी इंगोले यांनी केले…