पिंच्याक सिल्याट स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केली पदकांची लयलूट

0
1013
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी

कोल्हापूर येथे दिनांक 13 ते 15 जानेवारीला संपन्न झालेल्या 8 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण 27 जिल्ह्यातील सहाशे ते साडेसहाशे खेळाडुंनी सहभाग घेतला होता स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई लयलूट केली.यामध्ये अकोला जिल्हा खेळाडूंनी विविध पदके पटकावले यात कुमारी पूनम लेव्हारकर,सुवर्णपदक ओम चांडक, कास्यपदक,भाविक लखोटीया कांस्यपदक,मीत सेदानी,कांस्यपदक बसवराज दसोडे, कांस्यपदक यश गावंडे,कांस्यपदक व आकाश धुमाळे कांस्यपदक आदींनी विविध पदकं कमावलित.स्पर्धेतील विजेत्यांची औरंगाबाद येथे 29 जानेवारीला होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे

त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक व मुंबईच्या संघाला चॕंम्पिअनशिप मिळाली आहे. अकोला जिल्हा असोसिएशनचे सचिव आकाश धुमाळे यांनी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले महाराष्ट्राचे सचिव माननीय किशोर येवले यांनी मुलांच्या यशाबद्दल कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला तसेच अकोला जिल्ह्याचे असोसिएशनचे सचिव आकाश धुमाळे व अध्यक्ष रवींद्र मालखेडे,दिक्षा शेवाळे ,योगेश जोंधळे चंद्रकांत लाहेकर,शरद हींगणकर , दीपक ससाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.