कोंडचा कलाकार महादेव कुंभार काळाच्या पडद्याआड

0
906
Google search engine
Google search engine

कोंडचा कलाकार महादेव कुंभार काळाच्या पडद्याआड

उस्मानाबाद / प्रतिनिधी- उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील मातीला आकार देण्यात परिसरात प्रसिद्ध असलेले कलाकाराचे आज अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे कोंडसह परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोंड येथील महादेव कुंभार यांना गेल्या महिनाभरापासून आल्पशा आजाराने घेरले होते .ते महिनाभर आजाराला आहवान देत म्रत्युशी झुंज देत होते.शेवटी आज त्यांच्यावर वयाच्या साठव्या वर्षी काळाने घाला घातला ता २०(रविवारी) दुपारी ४-४५ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.महादेव कुंभार हे अतिशय गरिबी परस्थीतीतून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवत असत.ते सांप्रदायीक होते गावातील विवीध भजनी मंडळात त्यांचा पकवाज वादक म्हणुन दरारा कायम होता. तसेच त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पारंपारिक व्यवसाय मातीपासून थंडगार कणखर मडके ,सणाला लागणारे मातीचे मडके , व इतर मातीचे साहित्य बनवून व्यवसाय करण्यात त्यांचे नाव प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने कोंडसह परिसरात व वारकरी सांप्रदायीक भजनी मंडळातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्यावर ता २१( सोमवारी) सकाळी नऊ वाजता कोंड येथील,हिंदू स्मशानभुमीत अंत्यविधी होणार आहे.कुंभार यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली व एक मुलगा ,सुन ,नातवंडे आसा परिवार आहे.