निवडणूक आली की नेत्यांना दिसते जाणता…!

0
1329
Google search engine
Google search engine

वरवंटा बकाल:- माजी उपमुख्यमंत्री अजित पवारच्या मंचावर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो,
संग्रामपूर ला राष्ट्रवादी ची परिवर्तन यात्रेची सभा..

बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट-बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रे वेळी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरच्या असलेल्या बैनरवर चक्क मोक्का कायद्या अंतर्गत अटक असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय… मंचावर लावण्यात आलेल्या या फोटो मुळे सभेला आलेल्या नागरिकांमध्ये सभेवेळी कुजबुच सुरू होती…दरम्यान मोक्का कायद्या अंतर्गत कार्यवाही झालेला आरोपी दीपक मानकर हा राष्ट्रवादी पक्षाचा विद्यमान नगर सेवक असून अश्या प्रकारे राष्ट्रवादी आरोपीचा फोटो बॅनरवर टाकून त्याला समर्थन तर करीत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे…
व्हिओ -1– माहितीनुसार, पुणे येथील शहर पोलिस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी २ जुन रोजी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे गाडी समोर आत्महत्या केली होती… तर आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहले होते… रस्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता… यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर विरोधात मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता..या घटनेनंतर दिपक मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता… मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, . परंतु सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळाले होते…दरम्यान मानकर हे जेल मध्ये आहेत…विशेष म्हणजे या गुन्ह्या व्यक्तरिक्त मानकर यांच्यावर अन्य गुन्हे ही दाखल असून याच आरोपीचा फोटो बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट-बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रे वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरच्या बॅनरवर लावण्यात आले होते हे विशेष.. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कोणी दिली खारपानपट्टा सोडण्याचे आश्वासन अन कुणी पुरवली १४० गावांना गोड पाण्याची योजना
यावेळी मा.अजितदादा म्हणले की सत्तेत येताच आम्ही खारपाण पट्टयातील शुद्ध पाण्याचा पुरवठा पुरवत करू परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी ही सत्ते पासून किती दिवस दूर होती व किती दिवस सत्तेमध्ये होते हे मात्र विसरले असावे निवडणूक आलिकीच जाग का येते मागील 4 वर्षात यांना या खारपाणी पट्टया विषय कोणी चर्चा सुद्धा केली नाही कोणत्या गोष्टीचा पाठ पुरवठा केला नाही मग आता निवडणूक तोंडावर आली की जनता दिसते.दहा वर्ष सत्ते पासून दूर असूनही स्थानिक आमदार संजय कुटे यांनी मतदारसंघात 140 गावांना पिण्याचा गोड पाण्याचा प्रश्न दूर केला हे सुद्धा येथे उल्लेखनीय आहे आणि आज माजी मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात जर सत्तेत आलो तर येथील खाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू मग सत़्येत असतांना यांनी काय केल यात किती सत्यता आहे हे जनताओळखुन आहे “ये पब्लिक है ये सब जाणती है” राष्ट्रवादी मध्ये नाराजीचा सूर जनते मध्ये दिसून आला.