मेळघाट ब्रेकिंग :- मेळघाटातील पुनर्वसित आदिवासींचा फॉरेस्ट व राज्य राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला – विळा, कुऱ्हाड,गोफण, मिरचीचा तुफान मारा

0
5143
Google search engine
Google search engine

सुमारे 41 जण जखमी, 22 जखमीना अकोला रवाना

आकोट/ ता.प्रतिनिधी

गेल्या आठवड्याभरापासून मेळघाटात प्रशासन विरुद्ध आदिवासींचा पेटलेला संघर्ष चिघळला आहे आज दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास केलपाणी तथा गुल्लरघाटच्या जंगलात आदिवासींनी वन कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात राज्य राखीव दलाच्या ठाणेदारासह वन अधिकारी व 41 जण जखमी झाले असून यातील 22 जखमींना आकोट ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अकोला रेफर करण्यात आले आहे.

जखमी वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुनर्वसनाच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाशी संघर्ष करत असणाऱ्या आदिवासींची आज दिनांक 22 रोजी केलपानी च्या घनदाट जंगलात वनकर्मचारींसोबत झडप झाली. हल्लेखोरांनी राज्य राखीव दलाच्या कर्मचार्‍यांसह वनकर्मचारींवर गोफणींनी दगडांचा तुफान मारा केला. हा हल्ला होताच जंगलातली परिस्थिती आणखीनच बिघडली. हल्लेखोरांनी जंगलातच कर्मचाऱ्यांवर हल्ला बोल केल्याने एरवी शांत असणाऱ्या जंगलात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या आपात्कालीन परिस्थितीने प्रशासन हादरले असून मेळघाटसह सातपुड्याच्या पायथ्याशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे .विशेष म्हणजे काल आदिवासी विरुद्ध चिखलदरा पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आदिवासी मधून संतप्त भावना व्यक्त होत असल्याच्या चर्चा या प्रकरणावरून दिसुन येत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मेळघाटातील केलपाणी हे अकोट जवळून साधारण 45 किलोमीटर असल्याने जखमींना उपचारासाठी अकोट आणत असताना प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे दिसून येत होते.जखमींमध्ये दोन महिला कर्मचारी असल्याने हल्लेखोरांनी महीलांनाही सोडले नसल्याचे जखमींनी यावेळी सांगितले याआधी जंगलात जाळपोळीचे व शासकिय गाड्यांचे हवा सोडण्याचा प्रकाराने फॉरेस्टने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई केली होती.मात्र आजच्या या आदिवासी व प्रशासनाच्या संघर्षाने जंगलातील परिस्थिती चांगली पेटली असल्याचे दिसत आहे. हल्ल्यातील जखमींना मानेवर ,डोक्यावर, पायावर छातीवर, पाठीवर मार असून परिस्थिती नाजूक असल्याचे कळते आहे.तर आदिवासी मधून कोणी जखमी असल्याची माहिती अजून पर्यंत मिळू शकली नाही. याबाबत नेमकी माहिती मिळू शकत नसल्याने जखमींमध्ये आदिवासींचा समावेश आहे की नाही हे वृत्त लिहिस्तोवर कळु शकले नाही. जखमी कर्मचाऱ्यांवर अकोट ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. जखमींमध्ये अविनाश जायभाये ,संजय इंगोले ,श्याम देशमुख, नितीन राऊत ,रवींद्र गुंनघाडे,रामेश्वर आडे, सुनील वाकोडे ,हरी नागरगोजे, श्रीकृष्ण परसनकर,एस बी घुगे,हेमंत सरकटे, शंकर डाखोडे,कैलास वाकोडे, संतोष चव्हाण ,सरस्वती डीकार, रामलीला सावंल,रघुनाथ नेवरे, रोशन कुडवे,नितीन सावंत,हरिष देशमुख, समाधान गुंगडे,एस डी जामकर,आकाश धांडे ,रवींद्र बुनघाडे,अनंता पवित्रकार ,सुरेश माने, मोतीराम राठोड, शेखर तायडे,हेम्मत खांडवाये, दिनेश केंद्रे ,आकाश शिंदे एस एम अंभोरे विनोद गिरुळकर,विवैक यवतकर ,आदींसह ईतरांचा समावेश आहे