युवक कॉग्रेस च्या आंदोलन ला फलश्रुती- मागण्या लवकरच होणार पूर्ण

0
820

एच इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी च्या मॅनेजर कडून मजुरांची कानउघाडणी

चांदुर बाजार;-

आपल्या कामप्रति हयगय करणाऱ्या एच जी इन्फ्रा कंपनी च्या मनमानी विरोधात युवक काँग्रेसचे आज आंदोलन करण्यात आले होते.त्यांनी चांदुर बाजार तालुक्यातील तळेगाव मोहना या ठिकाणी कोडवर्धा फाट्यावर कंपनीच्या गाड्या अडवून आंदोलन करण्यात आले.
अचलपूर मतदार संघातील सुरू असलेल्या 353 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग मध्ये बांधकाम प्रतिनिकृष्ट दर्जा बांधकाम,होत असल्याने युवक काँग्रेसचे अचलपूर मतदार संघाचे अध्यक्ष यांनी कार्यवाही साठी जिल्हा प्रशासन ला सात दिवसाचा अलतिमेन्ट दिला होता मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने युवक काँग्रेसचे आज आंदोलन करण्यात आले.
आंदोलन चे दखल घेत लवकरच आपल्या मागण्याची पूर्तता केली जाणार असल्याची कंपनीच्या अधिकारी यांना सांगितले आणि तसे लेखी सुद्धा देणार असल्याची कबुली दिली.शेवटी युवक काँग्रेसचे च्या पुढाकाराणे या रोडचे बांधकाम हे योग्य पद्धतीने होतील असे दिसत आहे.असे जर झाले नाही तर पुन्हा आठ दिवसात तीव्र आंदोलन करणार असलची माहिती विकास सोनार यांनी दिली.
या आंदोलनात इमरान खा,अनंत राऊत,गजानन आघाटे, परीक्षित घोम, प्रदीप वानखडे,सरपंच तळेगाव मोहना सुनील आकोलकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बॉक्समध्ये
“एकीकडे रस्त्याच्या बांधकाम मध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ठ पणा चा विषय असला तरी पूर्णा नदी पात्रातील खोलीकरण वर कोणीच का बोलत नाही अशा प्रश्न आहे.त्यामुळे या खोलीकरण मध्ये अनेकांना लक्ष्मी दर्शन तर झाले नाही अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे”

प्रतिक्रिया:-
विकासाच्या नावावर जर मतदार संघ भकास करत असाल तर यापुढे युवक कॉग्रेस त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.आठ दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या पेक्षा ही तीव्र आणि उग्र आंदोलन करून याची प्रशासन आणि कंपनी ने दखल घ्यावी.
विकास सोनार अचलपूर मतदार संघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष