ग्रामस्थांनी आपला संगणकीकृत सातबारा पडताळून पहावा :नायब तहसिलदार राजेंद्र यादव

Google search engine
Google search engine

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यततील संगणकीकृत सातबाराचे काम पूर्ण झालं असून काही किरकोळ त्रुटी वगळता सर्व ग्रामस्थांना त्यांचे सातबारा त्या त्या तलाठ्यांमार्फत वितरीत केला जात आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपला संगणकीकृत सातबारा जुन्या सातबाराशी पडताळून पहावा व काही अडचणी अथवा दोष असल्यास तात्काळ संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधून तो निदर्शनास आणून द्यावा असे आवाहन निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी केले. नेवरी (ता कडेगाव) येथे महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित फेरफार अदालत मध्ये यादव बोलत होते. यावेळी सरपंच मोहन सूर्यवंशी, मंडळ अधिकारी महेंद्र एटम, किरण चव्हाण उपस्थित होते.यावेळी फेरफार अदालत मध्ये वारस नोंद, ए कु म कमी करणे, अपाक कमी करणे, चुक दुरुस्ती, खरेदी दस्ताप्रमाणे नाव नोंद करणे, बँक बोजा कमी करणे व चढवणे अशा प्रकारची प्रकरणे दाखल करून घेण्यात आली व त्यानुसार संबंधित तलाठ्यांना तात्काळ निर्गत करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी यादव यांनी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, राष्ट्रीय वृद्धापकाळ व श्रावणबाळ योजनेची सविस्तर माहिती दिली व संबंधित योजनेचा लाभ घेण्याचेही आव्हान केले.या अदालतीत नेवरी मंडळातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यात चूक दुरुस्तीची २०, खरेदी नोंदीची ५ ,मंडळ अधिकारी निर्गत ची १० व इतर १५ अशी जवळपास ५० प्रकरणे जमा झाली. यावेळी तलाठी दिलीप चौरे, के सी वरकडे, के एस भोईर, यु डी शिंदे, बबन वीर, सूर्यकांत देसाई, बाळकृष्ण पाटील, हणमंत भोसले, बाबुराव कांबळे, हणमंत महाडीक, नाथा कांबळे, दत्तात्रय पवाळकर, भगवान महाडीक यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो ओळ :- फेरफार अदालत मध्ये ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेताना राजेंद्र यादव, महेंद्र एटम व दिलीप चौरे .