दारुविक्रेत्याकडून पत्रकाराला दरोड्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ; पत्रकार इम्राण शेख यांना दिली धमकी

0
715
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद /प्रतिनीधी – ढोकी येथील एका हातभट्टी दारु विक्रेत्याने ‘अवैध दारू धंद्याची बातमी का दिली म्हणून दरोड्याच्या गुन्ह्यात अडकिवता म्हणून धमकी दिली.या धमकीचा ढोकी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करुन दारु विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत अधिक माहिती की, 19 जानेवारी रोजी च्या दै.लोकमत च्या अंकात *ढोकी व परिसरात अवैध दारू विक्री जोरात* ही बातमी प्रकाशित केली होती.या बातमी वरुन ढोकी पोलीसांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात जोरदार मोहीम राबविली.दहा बारा ठिकाणी धाडी टाकून दारू विक्रेत्यावर धडक कारवाई केली.याचा राग मनात धरुन ढोकी येथील हातभट्टी दारु विक्रेता अबा चव्हाण याने दै.लोकमत पेपरचे वार्ताहर इम्रान शेख यांना माझी अत्या मुंबई ला रहाती तीकडच्या दरोड्याच्या चोरीचा सोना घेतला म्हणून अशा खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याची धमकी दिली.यावरून ढोकी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला.आला.तसेच पत्रकार संघाच्या वतीने ढोकी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक गणपत जाधव यांना निवेदन देऊन धमकी देणाऱ्या वर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर दैनिक सकाळचे राजेंद्र पाटील, दैनिक सामनाचे अरुण देशमुख, दैनिक पुण्य-नगरीचे सुरेश कदम, दैनिक दिव्य मराठी चे राजवर्धन भुसारे,दैनिक एकमतचे काकासाहेब पाटील,दैनिक लोकमतचे इम्रान शेख,दैनिक गावकरीचे सिध्देश्वर क्षिरसागर, युवकजन क्रांती चे संपादक शाकीर शेखहानुमंत सिरसट.नागोराव देशपांडे यांच्या स्वाक्षरी करुण निवेदन देण्यात आले.