*ऋषिकेश पवार मेन्स फिजिक्स बॉडीबिल्डिंगचा टायटल विनर*

0
1439
Google search engine
Google search engine

गडहिंग्लज येथे बॅ नाथ पै प्रशालेच्या प्रांगणात गांधीनगर युथ सर्कल तर्फे घेण्यात आलेल्या भव्य बंटीदा क्लासिक पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील लिबर्टी फिटनेस जिमचा खेळाडू व मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश रमेश पवार आर पी यांनी मेन्स फिजिक्स बॉडीबिल्डिंगचा टायटल ‘किताब मिळवून प्रथम बक्षीस मिळवले.माजी आमदार संजय(बाबा) घाटगे यांचे हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.ऋषीकेश पवार हा स्वतः अनेक वर्षे लिबर्टी फिटनेस जिम मध्ये सराव करत आहे व कडेगाव तालुक्यातील मुलांना स्वतःचे आरोग्य व शरीर संपदा कमावण्याचे प्रशिक्षण देत आहे.त्यांनी या दोन वर्षात अनेक स्पर्धेत बक्षिसे मिळवली आहेत.कडेगाव तालुक्यातील तो पहिला बॉडीबिल्डर व मेन्स फिजिक्स खेळाडू आहे. त्याच्या यशाबद्दल शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.या यशाबद्दल सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,भाजप चे जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख,युवा नेते धनंजय देशमुख, सोनहीरा संचालक दीपक भोसले,वसंतराव गायकवाड,रवींद्र दादा पालकर,कडेगाव नगरपंचायतीचे विरोधीपक्ष नेते उदयकुमार देशमुख, नगरसेवक नितीन शिंदे,कुलदीप दोडके,नगरसेविका अश्विनी वेल्हाळ,शांता घाडगे,सिंधुताई रास्कर, सुनील गाढवे,पत्रकार संघटना अध्यक्ष रजाअली पिरजादे, संतोष कणसे,सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या*फोटो*लिबर्टी जिमचा खेळाडू ऋषिकेश पवार याला पश्चिम महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग मधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना माजी आमदार संजय(बाबा)घाटगे व मान्यवर