लोकजागर मंचाच्या हळदी कुंकु समारंभात जलजागर

697

महिला मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद

अकोट/ता.प्रतिनीधी :

गप्पांची मैफल….,लांबलचक उखाणे… आणि लज्जतदार अल्पोपहार… अन सोबतीला जलजागराच्या ज्ञानाचे अखंड भान… हे चित्र होते लोकजागर मंच आकोट तर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभाचे. अकोट तालुका व शहरातील युवती व महिलांचा या अनोख्या समारंभास प्रचंड प्रतिसाद लाभला.

समाजभान जपणाऱ्या या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली ते जलजागराच्या उखाण्यांनी.या आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी आबाल वृद्धांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या लोकजागर मंचने सर्वांची मने जिंकली.शहरातील महीला वर्गामध्ये या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा होती. संक्रांतीच्या पर्वाचे औचित्य साधून दि. 20 जानेवारी रोजी हा शानदार सोहळा रविवारी अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. महिलांनी खचाखच भरलेल्या प्रांगणात पाणी फाउंडेशनच्या टीमने केलेली जलजागृती हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.


या जागृतीपर कार्यक्रमानंतर जया भारती यांनी सूत्रे सांभाळीत महिलांना बोलते केले. अनेकींनी सादर केलेले उखाणे समारंभाची रंगत वाढवत होते. रात्री 8 वाजेपर्यंत हा सोहळा रंगला.दरम्यान लोकजागरचे संस्थापक अनिल गावडे यांनी उपस्थित महिलांशी हितगुज साधले. कार्यक्रमातील महिलांची लक्षणीय उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. लोकजागर मंच च्या पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडीने या समारंभाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. महिलांसाठी लवकरच आणखी असेच भव्य कार्यक्रम घ्या,आम्ही आणखी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होऊ , अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनमधुन व्यक्त होत होत्या.कार्यक्रमाचे नियोजन आयोजक महिला सौ सविता गावंडे, श्रीमती वंदनाताई रोहणेकर, सौ लक्ष्मी बरेठिया, सौ वंदना शेंडोकार, सौ मंगला जायले, सौ आचल गाळखे, सौ वर्षा बोडखे, सौ भावना गावंडे, सौ संस्कृती गुप्ता, सौ बेबीताई मोकाशे,सौ अनुराधा शेंडोकार,सौ प्रमिला गुरेकार, सौ मंजिरी बोरोकार,सौ कविता तराळे, सौ जयश्री मंगळे,सिंधुताई गडम, सौ मीरा लोखंडे, सौ प्रियंका बेलसरे, सौ निलिमा जायले, सौ सविता खवले यांनी केले. उत्कृष्ट सूत्र संचालन सौ अंजली सपकाळ तर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व महिलांचे सौ स्मिता बोरोकार यांनी लोकजागर मंच परिवाराच्या वतीने आभार मानले.

जाहिरात