माणसाने पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा शिक्षणाने श्रीमंत व्हा — आमदार बच्चू कडू  हिवरखेड येथील नवोदय विद्यालयात  स्नेहसम्मेलनाचे थाटात उदघाटन ! 

0
2175
Google search engine
Google search engine

माणसाने पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा शिक्षणाने श्रीमंत व्हा — आमदार बच्चू कडू

हिवरखेड येथील नवोदय विद्यालयात स्नेहसम्मेलनाचे थाटात उदघाटन !
रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील नवोदय कनिष्ठ महाविद्यालय व नागोरावदादा सदाफळे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण गुणात्मक शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते या वर्षी सुद्धा स्नेहासम्मेलन कार्यक्रमाचे उदघाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी महिला बाल कल्याण सभापती वृषालीताई प्रकाश विघे , प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण सभापती श्रीपादराव ढोमने , सरपंच विजय पाचारे , हरिमोहन ढोमने , नानासाहेब धारमकर , मुख्याध्यापक प्रकाश घोरमाडे , दिलीप कवठकर , नारायण मेंढे , शरद तिडके , यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती .
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की माणसाने पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा शिक्षणाने श्रीमंत होणे गरजेचे आहे . आपली शिक्षण व्यवस्था वाईट होत चाललेली आहे आमदार , खासदार , यांची मुले शिक्षणासाठी बाहेर जात आहे . गरिबांसाठी वेगळी शाळा आणि श्रीमंतासाठी वेगळी शाळा झाल्यामुळे शिक्षण हे वेगवेगळ झालं आहे . विज्ञानाच्या काळात शाळेला महत्व देणे गरजेचे आहे मात्र येथे अस होतांना दिसत नाही आपल्याकडे शिक्षणापेक्षा इतर गोष्टींवर विशेष लक्ष दिले जात आहे , आपल्याकडे शेतकऱ्यांच्या समस्या , शिक्षनाच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये शेती , आरोग्याच्या व शिक्षणाच्या सेवा सुविधेचा बट्ट्याबोळ होतांना दिसत आहे . शिक्षण , आरोय , शेती या विषयावर विशेष लक्ष देणे काळाची गरज आहे , माणसाने शिकून मोठे होण्यासोबतच विचाराने मोठे होऊन जागा असे प्रतिपादन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केले .
यावेळी आमदार बच्चू कडू , राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बुले सर , व उद्योजक किशोर भोंड यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे संचालन ठाकरे म्याडम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ चिंचमलातपुरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवोदय विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वृंद अथक परिश्रम घेत आहे .