अकोट शिवसेनेने दिल्या आत्महत्याग्रस्त परिवारातील सदस्यांना जीवनावश्यक वस्तु

0
735
Google search engine
Google search engine

बाळासाहेब ठाकरें जयंती निमित्य विविध सामाजिक उपक्रम….

अकोट/ता.प्रतीनीधी

स्व. बाळासाहेब ठाकरें जयंती निमित्य सकाळी ९.०० वाजता अकोट शहर शिवाजी चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.यावेळी अकोट शहरातील व तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी देऊन तसेच गरजु आत्महत्याग्रस्त परिवारातील सदस्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन अकोट शहर व तालुक्यातील लाभार्थ्यांना आधार दिला.

यामध्ये दुर्गा नामदेव आवंडकार,उज्वला गोविंदराव अस्वार,मीराताई गणेश पळसकार,स्नेहल अजय गडम,उषा अशोकराव चौधरी,सुंनदा रमेश कोकाटे,वंदना राजेंद्र बेराड यांच्यासह अनेक निराधार नागरिकांना मदत करत आधार दिला.यावेळी माजी आमदार संजय गावंडे,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,युवासेना विस्तारक राहुल कराळे,महिला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,तालुका प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख सुनील रंधे,उपजिल्हासंघटक विक्रम जायले,माजी सभापती दिपक इंगळे,जि.प.सदस्य डॉ.प्रशांत अढाऊ,आदिवासी ता.प्रमुख सुभाष सुरत्ने,शहर संघटक रोशन पर्वतकर,विजय अंभोरे,दिलीप लेलेकर,गोपाल म्हैसने,रमेश खिरकर,अजय लेलेकर,महादेव आवंडकर,कुणाल कुलट,विजय भारसाकळे,कार्तिक खडेकार,गणेश चंडालिया,अतुल नवात्रे,धीरज गावंडे,नितीन लांडे,रणजित कहार,प्रशांत येउल,उमेश आवारे, शेंडोकार,गोपाल कावरे,देवानंद बोर्डे,पिंटू पालेकर,गोपाल साबळे,वहिद खान,मुकेश ठोकळ,प्रफुल बोरकुटे,बाळासाहेब नाठे, निलेश गौड,पिंटू वानखडे,दीपक रेखाते, चेतन कुटे,चेतन कुटे,धीरज शेळके,गजानन सातपुते,महेंद्र राजूरकर,नितीन सोनोने,अक्षय सपकाळ,सागर मुरकर,रवी पळसकार,सोनू गावंडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.