@11.15 PM चांदूर रेल्वेत धुव्वाधार पाऊस

0
930
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     कोणत्या ऋतुमध्ये पाऊस येणार हे सांगणे आता कठीण झाले आहे. कारण याचाच प्रत्यय गुरूवारी चांदूर रेल्वे शहरात पहावयास मिळाला. कोणतेही ढगाळ वातावरण नसतांना अचानक वातावरणात बदल होऊन रात्री ११.१५ पासुन पावसाला सुरूवात झाली.
       गुरूवारी रात्री ११ वाजतापर्यंत अचानक पाऊस येणार का हे वातावरणावरून कोणालाच माहित नव्हते. मात्र ऐन हिवाळ्यात अवघ्या काही मिनीटातच वातावरणात बदल झाला आणि ११.१५ वाजता विजांच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे रात्री अनेकांची झोप उडाली व या पावसामुळे नागरीक आश्चर्यच व्यक्त करू लागले. या दरम्यान काही प्रमाणात बारीक गारा सुध्दा पडल्या. वृत्तलिहोस्तर मध्यम प्रमाणात पाऊस सुरूच होता.