मोर्शी येथे पॉवर ऑफ मीडियाच्या तालुका कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न..

0
907

मोर्शी येथे पॉवर ऑफ मीडियाच्या तालुका कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न..

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी :

“द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन”च्या मोर्शी तालुका कार्यालयाचा उद्घाटन शानदार सोहळा नुकताच पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात अनेक संघटना स्थापन झाल्यात मात्र तळागळातील व प्रसार माध्यमाला पूरक असलेली द पावर ऑफ मीडिया फाऊंडेशन ही एकमेव संघटना महाराष्ट्रात उदयास आली असे प्रतिपादन उद्घाटक म्हणून पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना व्यक्त केले.द पावर ऑफ मीडियाच्या कार्यालय उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी अमरावती जिल्हा क्रीडा भारतीचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद म्हाला उपस्थित होते, यावेळी व्यासपीठावर मोर्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ शीला अशोक रोडे तसेच तहसीलदार अनिरुद्ध बक्षी द पावर ऑफ मीडियाचे राज्य संघटक तथा संस्थापक सदस्य संदीप बाजड, व पत्रकार संघटनेचे विदर्भ सदस्य राजेश्वर घोरमाडे, महिला जिल्हाध्यक्षा संगीताताई ढोके, जिल्हा सरचिटणीस सुभाष कोटेचा, सामाजिक कार्यकर्ता कमलसिंग चीतोडिया, उद्योजक जगदीश जयस्वाल यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.द पॉवर ऑफ मीडियाच्या उदघाटन प्रसंगी मोर्शी शहर व ग्रामीण भागातील ज्येष्ठ पत्रकार देवरावजी मुळे, रोहित प्रसाद तिवारी, बाळूभाऊ इंगळे, माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार राजाभाऊ बेले यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.यावेळी मोर्शी शहर व तालुक्याच्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गारपवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अरुण जोशी यांनी केले. यादरम्यान शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उदघाटन सोहळ्याला उपस्थित होते.