छेडछाडीला कंटाळून अशा किती स्वाती बळी पडणार – एसएफआय

384

दोषी आरोपींना आटक करून कठोर शिक्षा द्या     अन्यथा   संपूर्ण जिल्हामध्ये तिव्र आंदोलन करण्यात येईल – रूपेश चव्हाण (एसएफआय जिल्हाध्यक्ष)

माजलगांव(२५): वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावर आईसोबत राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीने मुलांकडून होणाऱ्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सध्या सरकार बेटी बचाव बेटी पडावो नुसती जहिरातबाजी करताना दिसत आहे.पण विद्यार्थ्यांनीच्या आणि महिलांच्या सुरक्षितते बाबद कुठलीही आंमलबजावणी दिसत नाही. दोषी आरोपींना तात्काळ आटक करून कठोर शिक्षा करावी आन्यथा संपूर्ण जिल्हामध्ये तिव्र आंदोलन करण्यात येईल असे एस एफ आय च्या वतीने माजलगांव येथील उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार याना निवेदन देण्यात आले. यावेळी “एसएफआय” चे जिल्हाध्यक्ष रुपेश चव्हाण, संतोष जाधव,सचिन, विजय राठोड सचिन सुरवसे, विठ्ठल सुरवसे, राहुल चव्हाण, सुनील चव्हाण, बाळु चव्हाण,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.