मुरुड येथील मौलाना आझाद ऊर्दू शाळेत वार्षीक स्नेह सम्मेलन उत्साहात

0
1901

मुरुड येथील मौलाना आझाद ऊर्दू शाळेत वार्षीक स्नेह सम्मेलन उत्साहात

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

मुरुड ता लातूर येथील मौलाना आझाद ऊर्दू शाळेत ता २८/१/२०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

स्नेह सम्मेलनाचा आनंद घेताना प्रेक्षक

जोहरुल कुराण बहुउद्देशीय संस्था ,मुरुड द्वारा संचलीत मौलाना आझाद ऊर्दू माध्यमिक विद्यालय मुरुड ता लातूर या शाळेत गेल्या दहा वर्षापासून वार्षीक स्नेह सम्मेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन हा कार्यक्रम साजरा केला जातो. त्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या बहूरंगी कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळते.या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत वर्ग आहेत.या कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे यांच्या हस्ते रिबीन कापुन करण्यात आली.

शाळेच्या विद्यार्थीनी मन्ग होऊन कार्यक्रम पाहताना

दरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण / पालक मेळावा / घेण्यात आला हा कार्यक्रम संस्थेचे सचीव मोईज काझी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी मुरुड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधीकारी भालेराव , प्रा.अंकुश नाडे ,आकाश कणसे,कोंडच्या माजि सरपंच ईमामबी मुलाणी,लक्ष्मीकांत तवले ,जयश्री पांचाळ, आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फेरोज शेख यांच्यासह सर्व शिक्षक /शिक्षिका /इतर कर्मचारी व शिक्षक व्रंद यांनी परिश्रम घेतले.