नकली नोटा चालविणाऱ्या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी – चांदूर रेल्वे पोलीस मुख्य आरोपीच्या शोधात

0
639
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

     चांदूर रेल्वे येथे रविवारी आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत एका किराणा दुकानात दोन हजारांची नकली नोट चालवितांना एका युवकाला नागरिकांनी रंगेहाथ पडकले. या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

        शहरातील गांधी चौकातील कृष्णकुमार ज्ञानचंद जैन यांच्या दुकानात रविवारी रात्री ७ वाजता आट्याची बॅग खरेदी केल्यानंतर आरोपी ईस्माईल खान शमसुद खान रा. खिडकी ता. लिवाई जि. नेक ( राजस्थान) याने नकली दोन हजाराची नोट जैन यांना दिली. दुकानदाराला नोटवर संशय आला व ही नोट नकली असल्याचे समजले. सदर बाब आरोपीला समजताच त्याने आपल्याजवळ असलेल्या ३ दोन हजारांच्या नोटा फेकुन दिल्या. व पळण्याच्या स्थितीत असतांना नागरीकांनी सदर आरोपीला पकडून ठेवले व पोलीसांना याबाबत माहिती दिली. यावेळी १०० – १५० नागरीक जमा झाले होते. यानंतर पीएसआय लसंते यांनी घटनास्थळावरून आरोपीला पोलीस स्टेशनला नेले. आरोपीची चौकशी केल्यानंतर रात्री मेहेरबाबा नगरमध्ये भाड्याने राहणाऱ्या आरोंपीच्या खोलीची झाडाझडती घेतली असता खोलीत सुध्दा पुन्हा दोन नकली नोटा सापडल्या. या प्रकरणात पोलीसांनी एकुण ५ दोन हजारांच्या नोटा व १ दोनशे रूपयाची नोट असे एकुण ६ नकली नोटा जप्त केल्या असुन काही नोटांचे नंबरही सारखेच आहे. यामध्ये पोलीसांनी आरोपीची दुचाकी व चारचाकी वाहन, दोन महागडे मोबाईल जप्त केले. या प्रकरणात पोलीसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने अज्ञात व्यक्तीला ‘ओके’ असा मॅसेज पाठविल्याने या मागे नकली नोटा चलनात आणण्याची टोळी असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांची एक चमु कारंजा (लाड) येथे चौकशी करीता गेल्याचे समजते. तसेच एक चमु राजस्थान ला पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अटक आरोपीविरूध्द कलम ४८९ (ब), ८/९ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी ईस्माईल खान याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधिक आरोपींच्या शोधात असुन ठाणेदार ब्रम्हदेव शेळकेंच्या मार्गदर्शनात पीएसआय लसंते, फुलेकर खोलात तपास करीत आहे.