चांदूर रेल्वे पोलीस राजस्थानला रवाना – पुन्हा सापडल्या दोन नकली नोटा

0
678
Google search engine
Google search engine
नकली नोटांचे कनेक्शन राजस्थान टू चांदूर रेल्वे
एक आरोपी आहे अटकेत
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      दोन हजारांची नकली नोट चालवितांना एका युवकाला नागरिकांनी रविवारी रंगेहाथ पडकले होते. यामध्ये नकली नोटांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असुन चांदूर रेल्वे पोलीस मंगळवारी सायंकाळी ७ वाजता राजस्थानला रवाना झाली आहे. यामध्ये पुन्हा दोन हजारांच्या २ नोटा पोलीसांना सापडल्या आहे.
        शहरातील गांधी चौकातील एका किराणा दुकानात रविवारी रात्री ७ वाजता आट्याचे बॅग घेतल्यानंतर आरोपी ईस्माईल खान वल्द समशूद खान (३५) रा. खिडकी ता. नवाई जि. टोक (राजस्थान) याने नकली दोन हजाराची नोट यांना दिली. दुकानदाराला नोटवर संशय आला व ही नोट नकली असल्याचे समजले. सदर बाब आरोपीला समजताच त्याने आपल्याजवळ असलेल्या ३ दोन हजारांच्या नोटा फेकुन दिल्या. व पळण्याच्या स्थितीत असतांना नागरीकांनी सदर आरोपीला पकडून ठेवले व पोलीसांना पाचारण केले. यावेळी १००-१५० नागरीक जमा झाले होते. यानंतर पीएसआय लसंते यांनी घटनास्थळावरून आरोपीला पोलीस स्टेशनला नेले. या प्रकरणात पोलीसांनी एकुण ५ दोन हजारांच्या नोटा व १ दोनशे रूपयाची नोट असे एकुण ६ नकली नोटा जप्त केल्या होत्या व काही नोटांचे नंबरही सारखेच आहे. यानंतर मंगळवारी पुन्हा दोन – दोन हजाराच्या २ नोटा आरोपीच्या भाड्याच्या घरून पोलीसांनी जप्त केल्या तसेच यामध्ये पोलीसांनी आरोपीची दुचाकी, महागडे मोबाईल जप्त केले.  सदर आरोपी चांदूर रेल्वे शहरात येऊन घरोघरी फिरून ब्लँकेट विकण्याचा व्यवसाय करीत होते. अटक आरोपींविरूध्द कलम ४८९ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे तार राजस्थानपर्यंत जुळले असल्याने या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय लसंते यांच्या नेतृत्वात ६ कर्मचाऱ्यांची चमु मंगळवारी सायंकाळी ७ वाजता चांदूर रेल्वेवरून राजस्थानसाठी रवाना झाले आहे. त्यामुळे आता राजस्थानवरून अधिक आरोपींना अटक होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळकेंच्या मार्गदर्शनात सुरू आहे.