सेदानी इंग्लीश स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
931
Google search engine
Google search engine

अकोट/ ता. प्रतिनिधी
स्थानिक पोपटखेड मार्गावरील लेट दिवाली बेन सेदानी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली ध्वजावंदनासह, बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रमुख अतिथी म्हणून भानुबाई सेदानी, जयंतीबाई सेजपाल, संस्थाध्यक्ष स्मिता सेदानी,किशोर सेदानी,भरतभाई बुद्धदेव,नितुल सेदानी,पुनम सेदानी, प्रिन्सिपल विजय भागवतकर ,प्रशांत मंगळे,स्नेहल अभ्यंकर आदींची उपस्थिती होती.

रोहन मोहोड ,ऋतुजा माकोडे या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले युकेजी ची विद्यार्थिनी आर्या अढाऊ हीने गीत सादर केले तर वर्ग तीन व चारच्या विद्यार्थ्यांनी देश है रंगीला वर नृत्य सादर केले तसेच वर्ग 4 च्या विद्यार्थ्यांनी योगा नृत्य सादर केल

े यावेळी ५ ते ९ च्या विद्यार्थी शिक्षकांनी भारतातील विविध प्रांताचे दर्शन दाखवणाऱ्या भारत की झाँकी हे विशेष नृत्य संगीतपर कार्यक्रम सादर केला यात महाराष्ट्र गुजरात पंजाब बंगाल कश्मीर सह विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले

त्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचावचा संदेश देणारी नृत्य नाटीका सादर केली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले तसेच विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्कार करून बक्षीसे देण्यात आली

शिक्षकांतर्फे संतोष विणके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन पुरन वाघमारे , जमील शेख यांनी तर आभार नितीन भास्कर यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.