दर्यापुर रोड वरुन अकोला रोड वर जाण्याकरीता रेल्वे अंडरब्रीजची नागरीकांची मागणी

0
2273

अकोट/ता.प्रतीनीधी

अकोला -अकोट रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजचे रुपांतरीकरणाचे काम सध्या युदध पातळीवर सुरु आहे या ब्रॉडगेज विस्तारीकरणात शहरवासियांच्या सोईची ठरणारी दर्यापुर रोड वरुन अकोला रोड वर जाण्याकरीता रेल्वे अंडरब्रीजची मागणी शहरवासी करीत आहेत विशेष म्हणजे या मार्गावरच्या रेल्वे अंडरबीजच्या सोईने परीसरातील विविध शैक्षणिक संस्था विदयार्थ्यां ,पादचारी, वयोवृदध ,कामगार, शेतावर जाणा-या महिला व लोकांसह रुग्णांकरीता सोईचा ठरणारा आहे. डिपी नकाशातील तसेच वास्तविक वाहतुकीत असलेल्या रोडवर रेल्वे अंडरब्रीजची मागणी गेल्या दिडवर्षा पासुन आकोट शहरातील सजग नागरीक व विविध संस्था करीत आहे हे विशेष.

शहरवासीयांच्या हया मागणीचा संस्कृती संवंर्धन समिती ही याबाबत अनेक दिवसांपासुन पाठपुरावा करीत आहे. समिती याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पालकमंत्री रणजीत पाटील खा. संजय धोत्रे,आ.भारसाकळे,नगराध्यक्ष माकोडे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी रेल्वेचे विभागीय अभियंता तथा नांदेड येथील डिआरएम , यांच्यशी निरंतर संपर्कात असुन रेल्वे विभागाच्या वतीने मा. डि.आर.एम नांदेड यांनी सदर अंडरब्रीज हा उपयुक्त् व सोईस्कर असल्याचे जिल्हाधिकारी अकोला यांना पत्र दिले असल्याचे समीतीचे म्हणने आहे.सदर पत्र जिल्हाधिकारींकडे प्रलंबीत असुन प्रत्येकांनी याबाबतीत सकारात्मक पत्रे दिलेली आहेत.परंतु रेल्वे डिपार्टमेंटने याबाबत एकही पाऊल उचलेली नाही आहे.असे ही याबाबत पाठापुरावा करणाऱ्या नागरीकांनी म्हटले आहे.

आज रोजी दर्यापुर रोडवरुन अकोला रोडवर जाण्याकरीता व्ही आकाराच्या टर्नवरुन जावे लगत आहे व मोठा पुल झाल्या नंतर निश्चित त्याकरिता जवळपास अकोला रोड वर जाण्यास 5 ते 10 मिनीटे लागतील.त्यामुळं हा ओव्हर ब्रिज विदयार्थ्यांकरिता , रुग्णवाहीके करीता , सायकल स्वार ,पदचारी महीला,पुरुष वृदधाकरीता, त्रासदायक ठरणार असुन जर डी पी नकाशामध्ये दर्शविलेल्याप्रमाणे व वास्तविक असलेला रोड हा दर्यापुर रोडला अंडरब्रिज मार्फत जोडला गेला तर तो लोकांना सुविधाजनक होईल. होईल.सदरचा रोड पुर्णत: वाहतुक उपयोगात असुन फक्त रेल्वे रोडचा स्पर्श् करणे अत्यावश्यक आहे.
विशेष म्हणजे त्या ठिकाणी अंडरब्रीज करीता पुरेसी उंची त्याठिकाणी असुन पाणी व्यवस्थापणेची अडचण ही त्या ठिकाणी दिसत नाही आहे. तसेच हया रस्त्याचा उपयोग दर्यापुर मार्गावरील गावांना अकोला,शेगाव,खामगाव,बुलढाणा,तेल्हारा जाण्याकरीता एकदमच सोईचा होणार आहे .रामेश्वर मंदीर स्माशान भुमीकडे अकोला रोड वरील नागरीकांना अंत्यविधी करण्या करीता यावे लागते यावेळी अंडरब्रीज उपयोगी ठरणार आहे.

अकोट शहरातील सर्वात जास्त अपघात हे अकोला रोडवरच झालेले आहेत. शिकवणी वर्ग , शाळा, कॉन्हेट, पेट्रोल पंम्प् हे, अकोला रोड वर पुलाच्या पलीकडेच आहेत आहे तेव्हा शहरात जाण्या येण्या करीता फक्त एकच मार्ग म्हणजे होणारा भलामोठा ओव्हर ब्रीज होणार आहे.मात्र यामार्गावर रेल्वे गेट दिल्या गेले तर अकोट शहरातील विदयार्थ्यांन करिता व लोकांन करिता फायदा होऊन अपघाताचे प्रमाण फार मोठया प्रमाणात कमी होतील त्यामुळं दर्यापुर मार्गाकडे रेल्वे ओव्हरब्रीज च्या मागाणीला सर्व स्तरातुन पाठींबा मिळतो. आहे.अकोट शहरातील कार्यरत असलेल्या अनेक समाजीक संस्था व संघटनांचा यामागणीला पाठींबा मिळत आहे. यात संस्कृती संवंर्धन समिती, जेसीआय अकोट, रोटरी क्लब अकोट, भुमि फाऊंडेशन , सफल फाऊंडेशन, संस्कार भारती यासह ईतर अनेक संघटनांचा पाठींबा असल्याचं या मागणीचा पाठापुरावा करणाऱ्या समीतीचे नंदकीशोर शेगोकार यांनी कळवले आहे.